Skin Care Tips : उन्हात गेल्यानंतर चेहऱ्यावर लाल चट्टे येतात? करा हे घरगुती उपाय

| Published : Apr 09 2024, 10:35 AM IST / Updated: Apr 09 2024, 03:59 PM IST

Skin Care in Summer

सार

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवतात. अशातच त्वचा लाल होणे, त्वचेवर लाल चट्टे येणे अशा समस्यांचा काही महिला सामना करतात. यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

Skin Care Tips : उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांश महिलांना त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात. याशिवाय चेहऱ्याला सनस्क्रिन किंवा स्कार्फ न बांधल्यास त्वचा लाल होते. यामुळे चेहऱ्याची चमक कमी होत काळवंडली जाते. अशातच तुमची त्वचा संवेदनशील असल्यास कडक उन्हात घराबाहेर पडल्यानंतर चेहरा लाल होतो. या समस्येवर काही घरगुती उपाय करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

दह्याच्या वापर
दही चेहऱ्यासाठी फायदेशीर असते. याचा वापर केल्याने त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. खरंतर, दह्यामध्ये प्रोबायोटिक्स गुणधर्म असतात जे त्वचेला थंडावा देतात. यामुळे दह्याचा पॅक तयार करून दररोज चेहऱ्याला लावू शकता.

दह्याचा पॅक तयार करण्यासाठी वाटीत एक चमचा दही घ्या. यामध्ये गुलाब पाण्याचे तीन-चार थेंब किंवा गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर मिक्स करा. यानंतर पॅक चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याची त्वचा उजळ होण्यासह त्वचेवरील लाल चट्टेही दूर होण्यास मदत होईल.

चंदन
उन्हाळ्याच्या दिवसात चेहऱ्यावर लाल चट्टे किंवा त्वचा लाल होण्याची समस्या उद्भवत असल्यास चंदनाचा वापर करू शकता. चंदनाचा वापर केल्याने त्वचा एक्सफोलिएट होण्यासह सनबर्नच्या समस्येपासूनही दूर राहता येते.

चंदनाचा फेसपॅक तयार करण्यासाठी वाटीत दोन चमचे चंदन पावडर घेऊन त्यात गुलाब पाण्याचे तीन-चार थेंब मिक्स करून पेस्ट तयार करा. चंदनाचा पॅक चेहऱ्याला लावून ठेवल्यानंतर 15 मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचा हेल्दी राहण्यास मदत होईल. (Unhalat twachechi kalji kashi ghaychi)

नारळाच्या पाण्याचा वापर
नारळाच्या तेलासह नारळाचे पाणीही चेहऱ्याला लावणे उत्तम असते. नाराळाच्या पाण्यात त्वचेला हाइड्रेड करण्याचे गुणधर्म असतात. नारळाच्या पाण्याचा वापर करून फेसपॅक तयार करण्यासाठी त्यामध्ये मुल्तानी माती मिक्स करा. यानंतर फेसपॅक चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे उन्हाळ्यात चेहऱ्यावर येणारे लाल चट्टे कमी होण्यास मदत होईल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

सुटलेले पोट कमी करायचेय? दररोज 10 मिनिटे करा हे काम

महिलांनो काम आणि कौटुंबिक जीवनातील संतुलन राखण्यासाठी नक्की वाचा...

Keto Diet करताना करा या फळांचे सेवन, झटपट चरबी होईल कमी