Keto Diet करताना करा या फळांचे सेवन, झटपट चरबी होईल कमी
किटओ डाएटचा सध्या ट्रेण्ड आहे. यामध्ये हाय फॅट्स आणि लो कार्ब्सचा डाएटचा समावेश असतो. कार्बचे प्रमाण या डाएटमध्ये कमी केले जाते. यामुळे डाएटसाठीच्या फळांची निवड करताना विचार करावा.
कार्ब्सच्या कारणास्तव काहीजण फळांचे सेवन करणे बंद करतात. खरंतर, असे नाही आहे. किटो डाएटमध्ये कोणत्या फळांचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
एवोकाडोमध्ये कार्बोहाइड्रेटचे प्रमाण कमी आणि हेल्दी फॅट्स अधिक असतात. यामुळे किटो डाएटमध्ये एवोकाडोचा समावेश करू शकता.
स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लॅकबेरीसारख्या फळांमध्ये कार्ब्सचे प्रमाण फार कमी असते. याशिवाय फायबर आणि अँटीऑक्सिड्ंट्सचे प्रमाण अधिक असते.
लिंबू आणि संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. याशिवाय कार्ब्सही कमी प्रमाणात असतात. किटो डाएटमध्ये लिंबू किंवा संत्र्यांचा वापर करू शकता.
ऑलिव्हही एक फळच आहे. याची चव गोड नसते. यामध्येही कार्ब्स कमी प्रमाणात असतात. किटो डाएटसाठी ऑलिव्ह बेस्ट पर्याय आहे.
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय व्हिटॅमिन आणि खनिजेही असतात. किटो डाएटसाठी कार्ब्सचे प्रमाण कमी असलेले फळ म्हणून कलिंगडाची निवड करू शकता.
नारळाचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो. यामध्येही कार्ब्स कमी असतात. याचेही सेवन तुम्ही किटो डाएटमध्ये करू शकता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.