थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्याघरी च्यवनप्राश तयार करू शकता. यासाठी काही घरगुती सामग्रीचा वापर करावा लागेल. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...

Home made chyawanprash recipe : थंडीचे दिवस सुरू होताच काही आजार मागे लागतात. अशातच घरच्याघरी आजीच्या बटव्यामधील काही उपाय केले जातात. यामुळे शरिराला उष्णता मिळण्यासह शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाईल. यासाठी घरच्याघरी च्यवनप्राश कशाप्रकारे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहूया...

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सामग्री

  • 500 ग्रॅम आवळा
  • 500 ग्रॅम साखर किंवा गूळ
  • 100 ग्रॅम तूप
  • 100 ग्रॅम तूप
  • दोन टिस्पून बदाम पावडर
  • केशर
  • दालचीनी पावडर
  • वेलची पावडर
  • जायफळ पावडर
  • सुंठ पावडर
  • काळे तीळ
  • गिलोय पावडर
  • पिपली पावडर

कृती 

  • सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून उकळून घ्या. आवळे थंड झाल्यानंतर त्यामधील बिया काढून टाकत बारीक वाटून घ्या.
  • कढईमध्ये थोड पाणी घेऊन त्यामध्ये साखर किंवा गुळाचा घट्ट पाक तयार करा.
  • आवळ्याचे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
  • च्यवनप्राशमध्ये शुद्ध तूप मिक्स करुन त्यामध्ये दालचिनी, वेलची, जायफळ, सुंठ, पिपली, गिलोय पावडर टाका.
  • मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध घाला आणि घट्ट झाकणबंद डब्यामध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.

अशाप्रकारे करा च्यवनप्राशचे सेवन
एक मोठा चमचा च्यवनप्राश सकाळी उपाशीपोटी दूधासोबत खाऊ शकता. तर लहान मुलांना दूधासोबत अर्धा चमचा च्यवनप्राश द्या. दररोज उपाशीपोटी च्यवनप्राशचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, पचनक्रिया सुधारणे आणि त्वचा उजळ होणे असे काही आरोग्यदायी फायदे होती.

आणखी वाचा : 

ग्रीन टी च्या बॅग फेकून देण्याएवजी तयार करा हे 4 फेस पॅक, उजळेल त्वचा

वयातील चाळीतील महिलांनी दररोज खा हे लाडू, हाडांना मिळेल बळकटी