Bosu Ball Exercises : बोसू बॉल एक्सरसाइज माहितीये? जाणून घ्या सविस्तर माहिती
Bosu Ball Exercise Tips : तेच तेच व्यायाम प्रकार करून कंटाळले आहात का? तर मग जाणून घेऊया बोसू बॉल एक्सरसाइजबद्दलची माहिती…
| Published : Oct 06 2023, 10:58 AM IST / Updated: Oct 16 2023, 11:26 AM IST
- FB
- TW
- Linkdin
निरोगी आरोग्यासाठी काय करावे?
Bosu Ball Exercise Tips In Marathi : निरोगी आरोग्य हे कायम पौष्टिक आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असते. फिट राहायचे असेल तर नियमित व्यायाम करावा लागेल. दररोज व्यायाम, योग किंवा वॉक करणारी माणसं फारच क्वचित सापडतील. शिवाय असेही काही लोक असतात जे काही दिवस उत्साहाने जीममध्ये जाऊन एक्सरसाइज करतील, पण नंतर त्यांच्या वर्कआऊट रुटीनला ब्रेक लागतो.
नवीन व्यायाम प्रकार
पण असा एक एक्सरसाइज आहे, जो करताना तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल आणि मानसिक-शारीरिक आरोग्यामध्येही (Health Tips In Marathi) सकारात्मक बदल पाहायला मिळतील. सध्या बोसू बॉल एक्सरसाइज हा प्रकार ट्रेंडमध्ये आहे. काय आहे हा नेमका प्रकार आणि या व्यायाम प्रकारामुळे कोणकोणते फायदे मिळतील? जाणून घेऊया सविस्तर…
बोसू बॉल एक्सरसाइज म्हणजे काय? (Bosu Ball Exercise Information In marathi)
बोसू बॉल हे एक व्यायामाचे साधन (Fitness Equipment) आहे, ज्याचा आकार सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळाकार असतो. बोसू बॉलच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केले जातात. या बॉलचा वापर करून एक्सरसाइज केल्यास शरीराचे स्नायू अधिक मजबूत होण्यास मदत मिळते.
बोसू बॉलच्या मदतीने एक्सरसाइज करण्याचे फायदे (Bosu Ball Exercise Benefits In Marathi)
- वाढलेले वजन कमी (Weight Loss Tips) करायचे असेल तर बोसू बॉल एक्सरसाइज सर्वोत्तम पर्याय आहे.
- शरीर मजबूत होते
- शरीराचे सांधे व हाडे मजबूत होतात
- बोसू बॉलच्या मदतीने व्यायाम केल्यास स्नायूंचे आरोग्य सुधारते
- पाठीच्या स्नायूंचाही चांगला व्यायाम (Stretch benefits) होतो आणि स्नायूंमधील लवचिकपणा देखील वाढतो
बोसू बॉलच्या मदतीने कसा करावा व्यायाम (Tips for Bosu Ball Exercise)
बोसू बॉलच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामांचा सराव केला जाऊ शकतो. यापैकीच एका एक्सरसाइजची आपण माहिती जाणून घेऊया.
ब्रीज एक्सरसाइज (Bridge Exercise with bosu ball)
- सपाट जमिनीवर बोसू बॉल ठेवा.
- यानंतर आपण पाठीवर झोपावे, पाय गुडघ्यामध्ये दुमडा आणि पायाचे तळवे बॉलवर ठेवा. तळव्यांची पकड घट्ट असावी.
- तुमच्या पोट-कमरेचा भाग वर उचला आणि पुन्हा खाली ठेवा. ही प्रक्रिया लयबद्ध पद्धतीने करावी.
- आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करावा.
तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.