Aluminium Foil Safety : चपाती आणि पोळी फॉइलमध्ये गुंडाळणे किती सुरक्षित?
आपण चपाती किंवा पोळी गरम आणि ताजी राहावी म्हणून ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवतो. पण अशा प्रकारे फॉइलमध्ये ठेवलेले अन्न खरंच सुरक्षित असते का? हे वापरण्यापूर्वी नक्की जाणून घ्या.

ॲल्युमिनियम फॉइलमधील अन्न
आपण ऑफिस, शाळा किंवा कॉलेजच्या डब्यात चपाती आणि पोळी ताजी राहावी म्हणून ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळतो. यामुळे दुपारपर्यंत किंवा रात्रीपर्यंत चपाती मऊ आणि गरम राहते. पण या फॉइलमध्ये गुंडाळलेले अन्न आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे?

गरम अन्न फॉइलमध्ये गुंडाळू नका
चपाती किंवा पोळी एकदम गरम असताना ती ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळणे योग्य नाही. गरम अन्नाची वाफ फॉइलच्या आतच जमा होते. यामुळे वाफेचे पाणी चपातीवर पडून ती चिकट आणि ओलसर होते.
आंबट आणि खारट पदार्थांसाठी धोकादायक
ॲल्युमिनियम फॉइल चपातीसाठी ठीक आहे, पण मीठ आणि आंबटपणा असलेल्या पदार्थांसाठी ती वापरणे धोकादायक ठरते. फॉइलचा संपर्क मीठ आणि आंबट पदार्थांशी आल्यास रासायनिक प्रक्रिया होते. यामुळे अन्नातील ॲल्युमिनियमचे प्रमाण नैसर्गिक पातळीपेक्षा वाढते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
मायक्रोवेव्हमध्ये फॉइल वापरू नका
अनेक जण चपाती किंवा इतर पदार्थ फॉइलमध्ये गुंडाळून मायक्रोवेव्हमध्ये गरम करायला ठेवतात. पण असे करणे अत्यंत चुकीचे आहे. अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेने याबद्दल महत्त्वाची सूचना दिली असून, मायक्रोवेव्हमध्ये फॉइल वापरणे धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे.
रोज फॉइलचा वापर करणे टाळा
दररोज डब्यात अन्न नेताना ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले नाही. फॉइलमधील ॲल्युमिनियमचा काही अंश अन्नात मिसळून आपल्या शरीरात जातो. शरीरातील ॲल्युमिनियमचे प्रमाण नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त वाढल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.






