- Home
- lifestyle
- मधुमेह, वजन आणि पोटावर 'कारल्याचा ज्यूस' करेल जादू! रोज सकाळी उपाशी पोटी प्या आणि पाहा ७ दिवसांत फरक
मधुमेह, वजन आणि पोटावर 'कारल्याचा ज्यूस' करेल जादू! रोज सकाळी उपाशी पोटी प्या आणि पाहा ७ दिवसांत फरक
कारले ही एक अशी भाजी आहे, ज्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, झिंक आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतात.

सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा ज्यूस प्या; जाणून घ्या फायदे
सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा ज्यूस प्यायल्याने कोणते फायदे होतात, ते जाणून घेऊया.
१. लठ्ठपणा कमी होतो
कारल्याच्या ज्यूसमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होते आणि वजन घटण्यास मदत होते.
२. ब्लड शुगर नियंत्रणात राहते
फायबरयुक्त कारल्याचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर कमी होते आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
३. पचनक्रिया सुधारते
कारले ही फायबरने समृद्ध असलेली भाजी आहे. त्यामुळे कारल्याचा ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
४. रोगप्रतिकारशक्ती वाढते
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेला कारल्याचा ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
५. लिव्हरचे आरोग्य
कारल्याचा ज्यूस प्यायल्याने लिव्हरमधील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि लिव्हरचे आरोग्य जपण्यास मदत होते.
६. त्वचेसाठी फायदेशीर
व्हिटॅमिन ए आणि सी सारखे घटक असलेला कारल्याचा ज्यूस त्वचेच्या आरोग्यासाठीही चांगला आहे. त्यामुळे आहारात नियमितपणे कारल्याच्या ज्यूसचा समावेश करू शकता.

