New Year's Eve 2024 : गुगलचे नववर्ष 2025 साठी काउंटडाउन सुरू, पाहा खास डुडल

| Published : Dec 31 2024, 08:20 AM IST / Updated: Dec 31 2024, 11:01 AM IST

Google Doodle

सार

New Year's Eve 2024 : गुगलकडून नवं वर्षाच्या पूर्वासंध्येआधी आपल्या होमपेजवर खास डुडल तयार करण्यात आले आहे. या डुडलसाठी गडद रंगांचा वापर करण्यात आला असून त्याला फेस्टिव्हलचा लूकही दिला आहे.

New Year's Eve 2024 : गुगलकडून आपल्या होमपेजवर नवं वर्षाच्या पूर्वासंध्येआधी खास डुडल तयार केले आहे. अ‍ॅनिमेडेट असणाऱ्या या डुडलमध्ये गुगलचे नाव जांभळ्या रंगातील ठळक अक्षरात लिहिले आहे. याच्या बाजूने ताऱ्यांनी चमकणारे आकाश दाखवले आहे. याशिवाय डुडलमधील ‘O’ अक्षराला घड्याळाचे रुप दिले असून 12 वाजण्यासाठी किती वेळ शिल्लक आहे हे दाखवले जात आहे.

वर्ष 2024 ला गुडबाय करत 2025 चे स्वागत करण्यासाठी आज संपूर्ण जग उत्साही आहे. म्हणूनच गुगलने खास डुडल तयार करत नवं वर्षाचे स्वागत करण्यासह नवी सुरुवात आणि नव्या संधींनाही आत्मसात करण्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे.

नवं वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन

आज 31 डिसेंबरला संपूर्ण जग नवं वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज आहे. अशातच सेलिब्रेशनसाठी वेगवेगळे प्लॅन तयार करण्यात आलेले आहेत. आजच्या संध्याकाळपासून ते घड्याळात 12 वाजल्यानंतर जोरजोर सेलिब्रेशन पहायला मिळणार आहे. पण तुम्ही वर्ष 2024 चा शेवटचा दिवस कसा घालवू शकता हे देखील जाणून घेऊया...

हाउस पार्टी

नवं वर्षाच्या स्वागतासाठी मित्रपरिवारासोबत हाउस पार्टीचे आयोजन करू शकता. यामुळे सेलिब्रेशनची मजा दुप्पटीने वाढली जाईल.

वेगवेगळे पदार्थ तयार करा

आज संध्याकाळी परिवारासोबत नव्या पदार्थांच्या रेसिपी तयार करून त्याचा आस्वाद घेत नवं वर्षाचे स्वागत करू शकता.

पार्टीचे आयोजन

घरी किंवा गच्चीवर पार्टीचे आयोजन करत तेथे गाणी, डान्स ठेवू शकता. याशिवाय पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांच्या खाण्यापिण्याची खास सोयही करू शकता.

कराओके नाइट

वर्ष 2024 ला गुडबाय करत आनंदाने नवं वर्ष 2025 चे स्वागत करण्यासाठी कराओके नाइटचा प्लॅन करू शकता.

सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हा

वर्ष 2024 च्या अखेरीस पार्टी करण्याचा प्लॅन नसल्यास एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

आणखी वाचा : 

2025 मधील सुट्ट्या आणि लाँग वीकेंड्सचा आनंद घ्यायचाय?, जाणून घ्या संपूर्ण List

New Year 2025 साजरे करण्यासाठी जाणून घ्या मुंबई, पुण्यातील टॉप डेस्टिनेशन्स!

 

Read more Articles on