१,९९९ रुपयांच्या EMI वर दसऱ्याला गाडी घेऊन या, धमाकेदार ऑफर घ्या जाणून
Maruti Suzuki Cars: दसऱ्याच्या मुहूर्तावर मारुती सुझुकीने विक्रीचा नवा विक्रम केला आहे. आकर्षक EMI ऑफर्स आणि जीएसटीमुळे कमी झालेल्या किंमतींमुळे कंपनीने नवरात्रीपासून आतापर्यंत ८०,००० गाड्यांची विक्री केली आहे.

१,९९९ रुपयांच्या EMI वर दसऱ्याला गाडी घेऊन या, मारुती सुझुकीने केली रेकॉर्डब्रेक विक्री
दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी संहिता सुरु झाली असून त्यामुळं गाड्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फायदा मारुती सुझुकी कंपनीला झाला आहे.
मारुती सुझुकीने ८० हजार गाड्यांची केली विक्री
मारुती सुझुकीने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गाड्यांच्या विक्रीला मुहूर्त मिळाला आहे. नवरात्रीच्या सुरुवातीपासून त्यांनी आतापर्यंत तब्बल ८० हजार गाड्यांची विक्री केली आहे.
विक्री वाढवण्यासाठी दिली आकर्षक ऑफर
विक्री वाढवण्यासाठी कंपनीने आकर्षक ऑफर दिली आहे. कंपनीने कार खरेदीसाठी फक्त १,९९९ प्रति महिना इतक्या कमी रकमेपासून EMI सुरु झाला आहे. अनेक ग्राहक आता दुचाकींकडून चारचाकी खरेदीकडे वळले आहेत.
विक्रीत झाला नवा विक्रम
जीएसटी लागू झाल्यानंतर मारुतीने तब्बल २५,००० कारची डिलिव्हरी देऊन ३५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. आता हाच सिलसिला पुढं सुरु झाला आहे. नवरात्री सुरु झाल्यापासून ८०,००० गाड्यांची विक्री केली जाणार आहे. दररोज सुमारे ८०,००० ग्राहक नवीन कारबद्दल चौकशी करत आहे.
छोट्या कारच्या विक्रीमध्ये झाली वाढ
जीएसटी कमी झाल्यामुळे गाड्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामध्ये मारुतीच्या छोट्या गाड्यांच्या किंमती अजून डाऊन झाल्या असून त्यामुळं ग्राहक गाड्यांच्या खरेदीमध्ये रस दाखवत आहेत.
गाड्यांचा पुरवठा करण्यावर कंपनीवर आला ताण
गाड्यांचा पुरवठा करताना कंपनीवर ताण निर्माण झाला आहे. अनेक वाहने अजूनही बनत असून लवकरच ग्राहकांना देण्यात येतील. जीएसटी कपात, दमदार EMI आणि किंमतीमधील कपातीमुळे गाड्यांच्या विक्रीत वाढ होत आहे.

