Ganesh Chaturthi 2024 : पुण्यातील 5 मानाचे गणपती, वाचा कुठे आणि कसे पोहोचाल
- FB
- TW
- Linkdin
कसबा गणपती- मानाचा पहिला गणपती
कसबा गणपती पुण्यातील ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. कसबा पेठेत असणारा हा गणपती पेशवेकालीन असून त्याचे मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती साडेतीन फूट उंचीची आहे. आधी ती खूप लहान होती मात्र शेंदूर लेपून ती मोठी करण्यात आली आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे असे म्हटले जाते. वर्ष 1636 मध्ये शहाजी राजांनी लालमहाल बांधला त्यावेळी त्याच्याच बाजूला जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जायचे.
कसे पोहोचाल : 159, कसबा पेठ रोड, यशोदत्त हाउसिंग सोसायटी, फडके हौद, कसबा पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011
तांबडी जोगेश्वरी –मानाचा दुसरा गणपती
बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते.
कसे पोहोचाल : GV83+JWX, नरसिंहा चिंतामणी केळकर रोड, बुधवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411002
गुरुजी तालिम गणपती –तिसरा मानाचा गणपती
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली अशी आहे.
कसे पोहोचाल : 184, लक्ष्मी रोड, तुळशीबाग, बुधवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411002
तुळशीबाग गणपती- चौथा मानाचा गणपती
दक्षित तुळशीबागवाले यांनी वर्षे 1900 साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली. वर्ष 1975 मध्ये, पहिल्यांदाच फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना या मंडळाने केली. फायबरची मूर्ती स्थापन करणारे हे पहिलेच गणेश मंडळ होते.
कसे पोहोचाल : 81, बुधवार पेठ रोड, तुळशीबाग, बुधवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411002
केसरी वाडा गणपती- पाचवा मानाचा गणपती
पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचागणपती म्हणून याची ओळख आहे. केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा हा गणेशोत्सव वर्षे 1894 पासून सुरु झाला.
कसे पोहोचाल : 577, NC केळकर रोड, नारायण पेठ, पुणे, महाराष्ट्र 411030
आणखी वाचा :
गौरी-गणपतीसाठी शास्रोक्त पद्धतीने नैवेद्याचे पान कसे वाढावे? पाहा VIDEO
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाच्या पूजेवेळी म्हणा हे 5 स्तोत्र, होईल इच्छा पूर्ण