Ganesh Chaturthi 2024 : जापानसह या पाश्चिमात्य देशांमध्ये केली जाते गणपतीची पूजा
- FB
- TW
- Linkdin
गणेशोत्सव 2024
गणपती बाप्पाला बुद्धिची देवता, आराध्यदैवत अशा काही नावांनी ओखळले जाते. भारतात कोणतेही शुभ काम करण्याआधी बहुतांशजण गणपतीची पूजा करतात. पण भारताबाहेर देखील गणपतीची पूजा केली जाते. नेपाळमध्ये गणेश मंदिराची स्थापना सर्वप्रथम पहिला सम्राट अशोक यांची पुत्री चारुमित्राने केली होती. नेपाळमधील नागरिक गणपतीला सिद्धिदाता आणि विघ्नहर्त्याच्या रुपात मानतात. आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी जपानमध्ये गणपतीची पूजा केली जाते. याशिवाय चीनमध्ये प्राचीन हिंदू मंदिरांमध्ये चहूबाजूंच्या दरवाज्यांवर गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. एवढेच नव्ह तिब्बेटमध्येही गणपतीची पूजा केली जाते. जाणून घेऊया जापानसह अन्य कोणत्या देशांमध्ये गणपतीची मंदिरे आहेत याबद्दल सविस्तर…
जापान
जापानमध्ये गणपतीला 'कांगितेन' नावाने ओखळले जाते. याचा संबंध जापानमधील बुद्ध धर्माशी असल्याचे सांगितले जाते. कांगितेनच्या काही रुपांची पूजा केली जाते. येथे चर्तुभूज गणपतीचे वर्णन केल्याचे मिळते.
श्रीलंका
तमिळ बहुलक क्षेत्रामध्ये काळ्या पाषाणापासून तयार करण्यात आलेल्या ‘भगवान पिल्लयार’ म्हणजेच गणपतीची पूजा केली जाते. श्रीलंकेत गणपतीची 14 प्राचीन मंदिरे आहेत. कोलंबोजवळ केलान्या गंगा नदीच्या तटावर केलान्यामध्ये काही प्रसिद्ध बु्द्ध मंदिरांमध्ये गणपतीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे.
इंडोनेशिया
असे मानले जाते की, इंडोनेशियाच्या बेटावर भारतीय धर्माचा प्रभाव पहिल्या शतकापासून राहिला आहे. येथील भारतीयांसाठी गणपतीची मुर्ती खासकरुन भारतातून ऑर्डर केली जाते. येथे 20 हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचा फोटो देखील आहे. गणपतीला इंडोनेशियात ज्ञानाचे प्रतीक मानले जाते.
थायलंड
थायलंडमध्ये गणपती ‘फ्ररा फिकानेत’ च्या रुपात प्रसिद्ध आहे. येथील सर्व अडथळ्यांवर मात करणारा आणि यशाची देवता म्हणून गणपतीची पूजा केली जाते. नवा व्यवसाय आणि लग्नसोहळ्यावेळी गणपतीची थायलंडमध्ये पूजा होते. गणशोत्सव आणि गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
आणखी वाचा :
Ganesh Chaturthi 2024 : मुंबईत गणेशोत्सवाची धूम, पाहा बाप्पाच्या आगमनाचे PHOTOS
Ganesh Chaturthi 2024 : अष्टविनायकाच्या 8 गणपतींच्या मंदिरांची वाचा अख्यायिका