- Home
- lifestyle
- Superfoods For Brain: डोकं काम करत नाहीये? स्मार्ट लोक खातात हे ७ मेंदूवर्धक सुपरफूड्स, तुम्हीही ट्राय करा!
Superfoods For Brain: डोकं काम करत नाहीये? स्मार्ट लोक खातात हे ७ मेंदूवर्धक सुपरफूड्स, तुम्हीही ट्राय करा!
Superfoods For Brain: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खावेत.

मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी हे पदार्थ नक्की खा
मेंदूच्या आरोग्यासाठी आहारात समाविष्ट करण्यासारख्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया.
ब्लूबेरी
अँटीऑक्सिडंट्स भरपूर असलेली बेरी फळे आहारात घेतल्यास स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूचे आरोग्य जपण्यास मदत होते.
अक्रोड
जीवनसत्त्वे, हेल्दी फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते व मेंदूचे आरोग्य सुधारते.
अंडी
कोलीन, व्हिटॅमिन बी आणि फोलेटने युक्त अंडी खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य जपण्यास मदत होते.
हळद
हळदीमधील कर्क्युमिन स्मरणशक्ती वाढवते आणि मेंदूचे आरोग्य सुधारते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे आहारात हळदीचा समावेश करा.
पालक
व्हिटॅमिन के आणि बीटा-कॅरोटीनने युक्त असलेल्या पालकसारख्या पालेभाज्या खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य जपण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बिया
झिंक, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी असलेल्या भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

