ओमेगा-३ फॅट्स मेंदूच्या पेशींची रचना आणि त्यांच्यातील संवाद सुधारण्यास मदत करतात. फॅटी फिश, अळशीच्या बिया, चिया सीड्स आणि अक्रोड हे ओमेगा-३ फॅट्सचे उत्तम स्रोत आहेत.

मुंबई : निरोगी मेंदूच चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आवश्यक फॅट्स, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त आहार घेतल्यास विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि मज्जासंस्थेचे (nervous system) आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी कोणकोणते पोषक घटक आवश्यक आहेत, ते आपण जाणून घेऊया.

एक

ओमेगा-३ फॅट्स मेंदूच्या पेशींची रचना आणि त्यांच्यातील संवाद सुधारण्यास मदत करतात. फॅटी फिश, अळशीच्या बिया (flax seeds), चिया सीड्स आणि अक्रोड हे ओमेगा-३ फॅट्सचे काही उत्तम स्रोत आहेत.

दोन

कोलीन (Choline) हा घटक 'अॅसिटिलकोलीन' (acetylcholine) तयार करण्यास मदत करतो, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि मज्जातंतूंमधील संवाद सुधारतो. अंडी, सोयाबीन, दूध आणि शेंगदाणे यातून कोलीन मिळते.

चार

बी जीवनसत्त्वे (B Vitamins) ऊर्जेची निर्मिती, न्यूरोट्रान्समीटर आणि मज्जातंतूंचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करतात. कडधान्ये, पालेभाज्या, धान्ये, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ हे बी-व्हिटॅमिन्सचे उत्तम स्रोत आहेत.

पाच

लोह (Iron) मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे आणि मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्याचे काम करते. सुकामेवा, कडधान्ये, तीळ आणि पालेभाज्यांमधून लोह मिळते.

सहा

मॅग्नेशियम मज्जासंस्थेतील सिग्नल वहन आणि मेंदूच्या पेशींमधील संवादाला मदत करते. नट्स, कडधान्ये, धान्ये आणि पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.

सात

झिंक मेंदूच्या पेशींमधील संवाद आणि मज्जासंस्थेचे सामान्य कार्य सुधारण्यास मदत करते. भोपळ्याच्या बिया, तीळ, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि सीफूडमधून झिंक मिळते.

View post on Instagram