MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Lizard Repellent : घरात पालींचा सुळसुळाट झालाय? केमिकलशिवाय पालींना घालवण्यासाठी ५ सोपे उपाय करून पाहा

Lizard Repellent : घरात पालींचा सुळसुळाट झालाय? केमिकलशिवाय पालींना घालवण्यासाठी ५ सोपे उपाय करून पाहा

घरात पाली दिसल्या की अनेकांना भीती वाटते किंवा किळस येते. बाजारात मिळणारी केमिकल्स लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच, घरातल्या घरात सोपे उपाय करून पालींना सहजपणे दूर ठेवता येतं.

2 Min read
Author : Karishma R
Published : Aug 20 2026, 05:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
पालींना घराबाहेर काढण्याचे ५ सोपे उपाय
Image Credit : AI Image

पालींना घराबाहेर काढण्याचे ५ सोपे उपाय

भिंतीवर सरपटणारी पाल पाहिली की अनेकांना भीती वाटते आणि किळसही येते. पालींमुळे घरातील अन्नपदार्थ विषारी होण्याचा धोका असतो. अनेकजण पालींना घालवण्यासाठी बाजारातील रासायनिक स्प्रे वापरतात. पण हे स्प्रे आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः घरात लहान मुले आणि पाळीव प्राणी असल्यास, खूप धोकादायक ठरू शकतात. कोणताही धोका न पत्करता, आपल्या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक वस्तू वापरून पालींना घराबाहेर काढण्याचे ५ सोपे उपाय जाणून घ्या.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
घरगुती स्प्रे
Image Credit : AI Image

घरगुती स्प्रे

कांदा आणि लसणाचा स्प्रे - कांदा आणि लसणाचा उग्र वास पालींना अजिबात सहन होत नाही. काही लसणाच्या पाकळ्या आणि कांद्याचे तुकडे मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे मिश्रण पाण्यात मिसळून एका स्प्रे बाटलीत भरा. जिथे पाली जास्त दिसतात, जसं की खिडक्या, दारांचे कोपरे आणि ट्यूबलाइटच्या मागे, तिथे हा स्प्रे मारा. या वासामुळे पाली त्या ठिकाणी फिरकणार नाहीत.

घरगुती काळी मिरी स्प्रे - एका स्प्रे बाटलीत पाण्यात दोन चमचे काळी मिरी पावडर किंवा लाल तिखट मिसळा. हे मिश्रण पालींच्या त्वचेला आणि डोळ्यांना तीव्र जळजळ करायला लावतं. जिथे पाली दिसतात तिथे हा स्प्रे फवारल्यास त्या लगेच ती जागा सोडून पळून जातात.

Related Articles

Related image1
Heart Attack Symptoms : हार्ट अटॅकची 'सायलेंट' लक्षणं, असा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका
Related image2
Vastu for Home Entrance : तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा नाहीये? दारासमोर 'या' चुका तर करत नाही ना?
33
या तीन गोष्टी करुन पाहा
Image Credit : Asianet News

या तीन गोष्टी करुन पाहा

अंड्याच्या कवचांची ट्रिक - अंड्याच्या कवचांमधून एक विशिष्ट प्रकारचा वास येतो, जो पालींना आवडत नाही. शिवाय, ही कवच पाहून आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा जीव इथे आहे, या भीतीने पाली त्या जागेपासून दूर राहतात. अंड्याची टरफलं स्वच्छ करून घरातील कोपऱ्यात आणि खिडक्यांजवळ ठेवा.

मोराच्या पिसांची जादू - मोर हा पालींचा नैसर्गिक शत्रू आहे. त्यामुळे मोराची पिसं पाहून पाली प्रचंड घाबरतात. हॉलमधील भिंतींवर किंवा मुख्य दाराजवळ मोराची पिसं लावली, तर घर सुंदर दिसेल आणि पालींचा त्रासही कमी होईल.

अंधाऱ्या जागा स्वच्छ ठेवा - पाली घरात येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना मिळणारं खाद्य. घरातले किडे, माश्या आणि डास हे पालींचं मुख्य अन्न आहे. त्यामुळे घरात अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवा. सिंकमध्ये खरकटी भांडी साठवू नका आणि दिव्यांभोवती किडे जमा होणार नाहीत याची काळजी घ्या. पालींना खायला काही मिळालं नाही, की त्या आपोआपच घरातून निघून जातील.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Heart Attack Symptoms : हार्ट अटॅकची 'सायलेंट' लक्षणं, असा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका
Recommended image2
साडी-सलवार सूटवर ट्राय करा या डिझाइन्सचे पेटेंड, खुलेल लूक
Recommended image3
Rahu Ketu Transit : राहू-केतूचा फेरा, 'या' ६ राशींची डिसेंबरपर्यंत डोकेदुखी वाढणार!
Recommended image4
Hina Khan : सुंदर त्वचेसाठी हिना खानचं खास मॉर्निंग रुटीन, तुम्हीही करून बघा 'ही' एक गोष्ट
Recommended image5
Hot vs Cold Shower : गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड? योग्य वेळ कोणती? जाणून घ्या साधासोपा नियम
Related Stories
Recommended image1
Heart Attack Symptoms : हार्ट अटॅकची 'सायलेंट' लक्षणं, असा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका
Recommended image2
Vastu for Home Entrance : तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा नाहीये? दारासमोर 'या' चुका तर करत नाही ना?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved