MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Heart Attack Symptoms : हार्ट अटॅकची 'सायलेंट' लक्षणं, असा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका

Heart Attack Symptoms : हार्ट अटॅकची 'सायलेंट' लक्षणं, असा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका

जगभरात होणाऱ्या मृत्यूंमागे हृदयरोग हे एक प्रमुख कारण आहे. अमेरिकेतील 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' (CDC) नुसार, तिथे ६ कोटींहून अधिक महिला (४४ टक्के) कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या हृदयरोगाने ग्रस्त आहेत.

2 Min read
Author : Karishma R
Published : Aug 20 2026, 03:55 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
हृदयरोगाची काही महत्त्वाची लक्षणं
Image Credit : Getty

हृदयरोगाची काही महत्त्वाची लक्षणं

जगभरात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे हृदयरोग. अमेरिकेतील 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' (CDC) नुसार, तिथे ६ कोटींहून अधिक महिला (४४ टक्के) कोणत्या ना कोणत्या हृदयरोगाने ग्रस्त आहेत. 'कोरोनरी आर्टरी डिसीज' हा सर्वात सामान्य हृदयरोग आहे. हृदयरोगाची काही महत्त्वाची लक्षणं जाणून घ्या.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
कारण नसताना येणारा थकवा
Image Credit : Getty

कारण नसताना येणारा थकवा

कोणतंही कारण नसताना सतत थकवा जाणवणं, हे हृदयरोगाचं एक महत्त्वाचं पण असामान्य लक्षण आहे. रोजच्या कामामुळे येणाऱ्या थकव्यापेक्षा हा थकवा वेगळा असतो; आराम करूनही तो जात नाही. हृदयाच्या स्नायूंना कमी रक्तपुरवठा होत असल्याचं हे लक्षण असू शकतं. जेव्हा हृदय व्यवस्थित रक्त पंप करू शकत नाही, तेव्हा महिलांना प्रचंड थकवा जाणवतो.

Related Articles

Related image1
Hot vs Cold Shower : गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड? योग्य वेळ कोणती? जाणून घ्या साधासोपा नियम
Related image2
Kitchen Sponge : भांड्याचा स्पंज बनतोय आजारांचं घर? ५ सोप्या टिप्सने करा १०० टक्के जर्म-फ्री
37
जबडा, मान आणि खांद्यात वेदना
Image Credit : Getty

जबडा, मान आणि खांद्यात वेदना

जबडा, मान किंवा खांद्यापर्यंत पसरणारी वेदना हे हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. अनेकजण याकडे दातांची समस्या किंवा ताणामुळे होणारी वेदना समजून दुर्लक्ष करतात. पण या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास 'कोरोनरी आर्टरी डिसीज'चा धोका वाढू शकतो.
47
अचानक धाप लागणं
Image Credit : Instagram

अचानक धाप लागणं

झोपल्यावर किंवा कोणताही शारीरिक श्रम न करता अचानक धाप लागणं, हे हृदयरोगाचं एक गंभीर लक्षण आहे. हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यावर फुफ्फुसात पाणी साचू लागतं. अनेकदा लोक याला अस्थमा किंवा चिंता समजून दुर्लक्ष करतात. महिलांमध्ये रात्रीच्या वेळी हा त्रास अधिक वाढल्याचं दिसून येतं.
57
मळमळ आणि पोटदुखीकडे दुर्लक्ष नको
Image Credit : Getty

मळमळ आणि पोटदुखीकडे दुर्लक्ष नको

सतत मळमळ, उलट्या किंवा अपचनासारखी पोटदुखी ही हृदयरोगाची लक्षणं असू शकतात. हृदयाशी संबंधित 'वेगस' नर्व्हमध्ये (Vagus Nerve) अडथळा आल्यानं पचनाच्या समस्या निर्माण होतात. अनेक महिलांना पोटाच्या वरच्या भागात दाब किंवा गॅसमुळे होणाऱ्या वेदना जाणवतात. त्या अनेकदा याला ॲसिडिटी (Acid Reflux) किंवा पचनाची समस्या समजतात. हृदयाकडून रक्तपुरवठा कमी झाल्यास पोटाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि असं घडतं.

67
पायांवर अचानक सूज येणं
Image Credit : Getty

पायांवर अचानक सूज येणं

घोटे, पाय आणि तळपायांवर अचानक सूज येणं हे शरीरात पाणी साचल्याचं लक्षण आहे. हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यानं असं होतं. महिलांमध्ये हृदयरोगामुळे अनेकदा हृदयाच्या उजव्या भागाच्या कार्यात बिघाड होतो. यामुळे नसांमध्ये रक्त साचून शरीराच्या भागांवर सूज येते. दिवसाच्या शेवटी किंवा जास्त मीठ खाल्ल्यावर हा त्रास आणखी वाढतो.
77
अचानक थंड घाम येणं, हे लक्षण आहे
Image Credit : Getty

अचानक थंड घाम येणं, हे लक्षण आहे

चक्कर किंवा डोकेदुखीसोबत अचानक थंड घाम फुटत असेल, तर हे हृदरोगाचं लक्षण असू शकतं. रक्तदाब कमी झाल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो, ज्यामुळे महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
साडी-सलवार सूटवर ट्राय करा या डिझाइन्सचे पेटेंड, खुलेल लूक
Recommended image2
Rahu Ketu Transit : राहू-केतूचा फेरा, 'या' ६ राशींची डिसेंबरपर्यंत डोकेदुखी वाढणार!
Recommended image3
Hina Khan : सुंदर त्वचेसाठी हिना खानचं खास मॉर्निंग रुटीन, तुम्हीही करून बघा 'ही' एक गोष्ट
Recommended image4
Hot vs Cold Shower : गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड? योग्य वेळ कोणती? जाणून घ्या साधासोपा नियम
Recommended image5
Black Pepper : काळी मिरी खाण्याचे १० जबरदस्त फायदे, आहारात नक्की समावेश करा
Related Stories
Recommended image1
Hot vs Cold Shower : गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड? योग्य वेळ कोणती? जाणून घ्या साधासोपा नियम
Recommended image2
Kitchen Sponge : भांड्याचा स्पंज बनतोय आजारांचं घर? ५ सोप्या टिप्सने करा १०० टक्के जर्म-फ्री
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved