उपवासाला साबुदाणा खाणं फायदेशीर, उच्च रक्तदाब असल्यास येईल चांगला गुण
साबुदाणा हा कसावा वनस्पतीच्या कंदमुळांपासून बनवला जातो आणि भारतात केरळ व तामिळनाडूमध्ये याचे उत्पादन होते. उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या या पदार्थात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तो अशक्तपणा दूर करतो आणि उच्च रक्तदाबावरही फायदेशीर ठरतो.

उपवासाला साबुदाणा खाणं फायदेशीर, उच्च रक्तदाब असल्यास येईल चांगला गुण
नवरात्रीच्या उपवासासाठी कित्येक लोक साबुदाणा खातात. साबुदाण्याची खिचडी कशी तयार करतात, साबुदाण्याची उत्पादन सर्वाधिक कोणत्या ठिकाणी होते? साबुदाण्याचे सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात याबाबत तुम्हाला माहिती आहे का, याबद्दलची माहिती घेणार आहोत.
साबुदाणा कोणत्या वनस्पतीपासून तयार होतो?
टॅपिओका म्हणजेच साबुदाणा होय, जो कसावा वनस्पतीच्या कंदमुळांपासून काढलेल्या स्टार्चपासून बनतो. या वनस्पतीला सागो असेही म्हणतात. सागो हे रातल्यापासून दिसणारे कंदमुळे आहेत.
अनेक देशांमध्ये सागोचा केला जातो वापर
अनेक देशांमध्ये सागोचा वापर केला जातो. ब्राझील, अमेरिका आणि आशियाशिवाय अनेक देशांमध्ये सागोचा वापर केला जातो. युरोपमध्ये याला वेगळ्या नावाने ओळखले जाते.
साबुदाणा तयार केला जातो?
सागो पिकाची लागवड पूर्ण झाल्यानंतर त्या पिकाची छाटणी करून कंदमूळ काढले जाते. हे कंदमूळ स्वच्छ करून बारीक करून कंदमूळ काढले जाते. हे कंदमूळ चांगले स्वच्छ करून बारीक केले जाते.
साबुदाणा स्वरूप कसं मिळतं?
साबुदाणा स्वरूप मिळण्यासाठी कंदमुळे सर्वात आधी धुवून स्वच्छ करून घ्यावे लागतात. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून गरम केले जाते आणि त्यानंतर मशीनमध्ये दाणेदार आकार दिला जातो. त्यानंतर त्याला साबुदाणा स्वरूप मिळते.
भारतात कोणत्या ठिकाणी पीक घेतलं जातं?
भारतात केरळमध्ये सर्वाधिक प्रमाणात साबुदाण्याची शेती केली जाते. त्याशिवाय तामिळनाडूमध्ये हे पीक घेतले जाते. मल्याळम भाषेत त्याला कप्पा असं म्हणतात.
साबुदाण्याचे फायदे काय आहेत?
साबुदाण्यात लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीला मदत होते. अशक्तपणा निर्माण करणाऱ्या आजारापासून मुक्तता मिळते. रक्तदाबावर उपचार करण्यासाठी साबुदाण्याचा वापर केला जातो.

