Dussehra 2025 : दसऱ्याला नीलकंठ पक्षी दिसणं शुभ असतं का? वाचा
Dussehra 2025 : दसऱ्याला नीलकंठ पक्षी दिसणं खूप शुभ मानलं जातं. पौराणिक कथेनुसार, भगवान रामाने रावणाचा वध करण्यापूर्वी नीलकंठ पक्षी पाहिला होता. याला विजय, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं.

दसरा कधी आहे?
यावर्षी दसरा 2 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाईल. या दिवशी नीलकंठ पक्ष्याचे दर्शन खूप शुभ मानले जाते. लोक सकाळपासूनच नीलकंठ पक्षी पाहण्यासाठी आकाशाकडे बघत असतात. पण तुम्हाला यामागचं महत्त्व माहीत आहे का? चला जाणून घेऊया.
दसऱ्याला नीलकंठ दिसणं कसं असतं?
दसऱ्याला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन खूप शुभ मानले जाते, कारण याचा संबंध भगवान रामाच्या रावणावरील विजयाशी आहे. हे सौभाग्य, सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. दसऱ्याला नीलकंठ पक्षी दिसल्यास वर्षभर शुभ घटना घडतात आणि यश मिळते.
नीलकंठ पक्ष्याबद्दलची कथा काय आहे?
पौराणिक कथेनुसार, रामाने रावणाचा वध करण्यापूर्वी आणि नंतर नीलकंठ पाहिला होता. म्हणून हे विजयाचे प्रतीक आहे. रावणाच्या वधानंतर रामावर ब्रह्महत्येचा दोष लागला होता. तेव्हा भगवान शंकराने नीलकंठ रूपात दर्शन देऊन त्यांना पापमुक्त केले.
नीलकंठ पक्षी पाहिल्याने काय होतं?
हिंदू धर्मात नीलकंठ पक्षी सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. त्याचे दर्शन घेतल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. दसऱ्याला नीलकंठ पक्षी दिसल्यास भाग्य उजळते आणि सुख, सौभाग्य व समृद्धी येते, असे मानले जाते.
लग्नातील अडथळे दूर होतील
असे मानले जाते की, विवाहयोग्य व्यक्तींना दसऱ्याला नीलकंठ पक्षी दिसल्यास लग्नाचे योग जुळून येतात आणि अडथळे दूर होतात. दसऱ्याला शमीच्या झाडासोबत नीलकंठ पक्षी दिसणे हे शत्रूंवरील विजयाचे शुभ संकेत मानले जाते.

