सार

Skin  Care Tips : बदलत्या ऋतूचा व्यक्तीच्या त्वचेवर प्रभाव दिसून येतो. याच कारणास्तव त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर त्वचेची खास काळजी घेणे आवश्यक आहे.

Skin Care Tips : बदलत्या ऋतूचा प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यासह केस आणि त्वचेवर झालेला दिसतो. थंड हवेमुळे त्वचेमधील ओलसरपणा दूर होते. याच कारणास्तव उन्हाळ्यापासून ते हिवाळ्यापर्यंत ऋतू बदलामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्याचे दिसते. याशिवाय त्वचा कोरडी झाल्यास व्यक्तीच्या चेहऱ्याचा उजळपणा देखील कमी होते. एवढेच नव्हे त्वचेवर लाल रंगाचे चट्टेही येतात. या समस्येपासून दूर राहण्यासाठी पुढील काही टिप्स नक्की फॉलो करा.

हाइड्रेट राहा
बदलत्या ऋतूमध्ये त्वचा कोरडी होऊ लागते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी शरीर हाइड्रेट राहणे फार महत्वाचे आहे. यामुळे दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या. पाणीदार फळांचे सेवन केल्यानेही शरिरातील पाण्याची कमतरता दूर होऊ शकते.

मॉइश्चराइजर आणि सनस्क्रिन
बदलत्या ऋतूमध्ये त्वचा कोरडी होण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी दिवसातून दोनवेळेस मॉइश्चराइजर आणि सनस्क्रिनचा वापर करावा. आपल्या स्किन टाइपनुसार, क्रिमची निवड करा. यासाठी जेल किंवा लाइट मॉइश्चराइजर वापरू शकता.

अधिक एक्सफोलिएशन करू नका
स्क्रब केल्याने त्वचेवरील डेड सेल्स कमी होत त्वचा उजळ होते. पण अधिक एक्सफोलिएशन केल्यास त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते. यामुळे बदलत्या ऋतूत त्वचा कोरडी होत असल्यास अधिक एक्सफोलिएशन करण्यापासून दूर राहा. आठवड्यातून दोनदा स्क्रब करा.

पाण्याकडे लक्ष द्या
बदलत्या ऋतूत त्वचा कोरडी होण्याचे कारण पाणी देखील असू शकते. या ऋतूत अधिक थंड किंवा गरम पाण्याचा वापर करत असाल तर त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे थंडीत कोमट गरम पाण्याने आंघोळ करावी.

घरगुती उपाय
त्वचा कोरडी होण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. यासाठी रात्री झोपण्याआधी त्वचेव कच्चे दूध, नारळाचे तेल किंवा बदामाचे तेल लावू शकता. याशिवाय मुल्तानी माती आणि मध मिक्स करुनही त्वचेला लावू शकता.

आणखी वाचा : 

व्यायामावेळी केलेल्या या 5 चुका ठरतील एंग्जायटीचे कारण, असे राहा दूर

चष्मापासून होईल सुटका, करा हे 5 घरगुती आयुर्वेदिक उपाय