- Home
- lifestyle
- चेहरा मुलायम, उजळ आणि तजेलदार करायचा आहे का? मग ‘दही’ हा घरगुती उपाय नक्की वापरून पाहा!
चेहरा मुलायम, उजळ आणि तजेलदार करायचा आहे का? मग ‘दही’ हा घरगुती उपाय नक्की वापरून पाहा!
Curd Face Packs For Glowing Skin: दह्यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते, त्वचेला नैसर्गिक चमक देते, टॅनिंग दूर करते आणि काळे डाग घालवते.

चेहऱ्यावर दही असं लावा; फायदे जाणून घ्या
दह्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांना प्रतिबंध करण्यास मदत करतात. दह्यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासही मदत करते.
दही
दह्यामध्ये असलेले झिंक काळे डाग दूर करण्यास आणि त्वचेला चमकदार बनविण्यात मदत करते.
दह्यापासून बनवलेले फेस पॅक
चला, दह्यापासून बनवलेल्या काही फेस पॅकबद्दल जाणून घेऊया.
१. टॅनिंग काढण्यासाठी
एक चमचा कॉफी पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि एक चमचा दही घालून मिश्रण बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी धुवा. हा पॅक चेहऱ्यावरील टॅनिंग काढण्यास मदत करेल.
२. काळे डाग घालवण्यासाठी
एक चमचा बेसनमध्ये चिमूटभर हळद आणि एक चमचा दही घालून मिश्रण बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी धुवा. हा पॅक चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी मदत करेल.
३. सुरकुत्या कमी करण्यासाठी
दोन चमचे ओट्स पावडरमध्ये एक चमचा दही आणि गुलाबजल घालून पेस्ट बनवा. १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. ओट्स कोलेजन उत्पादन वाढवून सुरकुत्या कमी करते आणि त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते.
हे लक्षात ठेवा:
ॲलर्जीची समस्या नाही ना, हे तपासण्यासाठी पॅक किंवा स्क्रब वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. तसेच, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच चेहऱ्यावर कोणतेही प्रयोग करणे नेहमीच चांगले.

