Diwali 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून साजरा करा दिव्यांचा सण

| Published : Oct 31 2024, 06:55 AM IST

Diwali 2024 Wishes in Marathi
Diwali 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून साजरा करा दिव्यांचा सण
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Diwali 2024 Wishes in Marathi : दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी आज साजरी केली जात आहे. घरोघरी गोंड्याचे तोरण, सुंदर रांगोळी काढून खास मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवून सण साजरा करा. 

Diwali 2024 Wishes in  Marathi : दिव्यांचा सण असणाऱ्या दिपावलीला आजपासून (31 ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. यावेळी देवी लक्ष्मीसह गणपतीची पूजा केली जाते. याशिवाय प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्याचा आनंदही साजरा केला जातो. यंदाची दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या मित्रपरिवाराला सुख-समृद्धीची, भरभराटीची जाण्यासाठी पुढील काही मराठमोळे संदेशन पाठवून सण साजरा करा...

आला सण दिव्यांचा, अंधकार बाजूला सारायला!
मनामनात प्रकाश पसरून जीवनचा सुंदर संदेश द्यायला!
दिवाळीच्या लाख मोलाच्या शुभेच्छा!

पणतीचा उजेड अंगणभर पडू दे लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे... 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

असेच दिवे जळत राहो, मनाशी मने जुळत राहो, 
सुख समृद्धि दारी येवो, लक्ष्मी घरी नांदत राहो, 
दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. 
विनंती आमची परमेश्वराला, सुखी, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो सर्वांना...

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

Read more Articles on