सार

Intermittent Fasting Tips : सध्या वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट ते एक्सरसाइज केल्या जातात. यापैकीच एक म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग असून याच्या मदतीनेही वेगाने वजन कमी होते. पण इंटरमिटेंट फास्टिंगवेळी काही चुका करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. 

Intermittent Fasting Tips : अलीकडल्या काळात वेगाने वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करण्याचा ट्रेन्ड सुरु झाला आहे. यापैकीच एक म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंगचाही वजन कमी करण्यासाठी पर्याय निवडला जातो. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह ते अभिनेत्री नेहा धूपियासह अन्य काही कलाकारांनी इंटरमिटेंट फास्टिंगच्या मदतीने 10-20 किलोपर्यंतचे वजन कमी केले आहे. कलाकारांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात वजन कमी झालेले पाहून काहीजणही इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेन्ड फॉलो करु लागतात.

खरंतर, इंटरमिटेंट फास्टिंगच्या मदतीने वजन कमी करता येते. मात्र इंटरमिटेंट फास्टिंग करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे असते. अन्यथा आरोग्यासह काही आजार मागे लागण्याची शक्यता अधिक वाढली जाते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये एका निश्चित वेळेपर्यंत भोजन करणे आणि उर्वरित वेळेत अन्नपदार्थ खाण्याएवजी केवळ पाणी पिणे. इंटरमिटेंट फास्टिंगचे काही प्रकारही आहेत. यामध्ये 16/8 मॉडेलमध्ये 16 तासांचा उपवास आणि 8 तासांमध्ये फूड्सचे सेवन करणे. यानंतर 5:2 मॉडेलमध्ये आठवड्यातील 5 दिवस सामान्य भोजन आणि अन्य 2 दिवस कॅलरीज नियंत्रणात ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करायचे असते.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • इंटरमिटेंट फास्टिंगवेळी उपाशी राहणे योग्य नाही. यासाठी योग्य आणि पोषणयुक्त आहाराचे सेवन करणे फार महत्वाचे आहे. डाएटमध्ये प्रोटीन, फायबर, फळ, भाज्या, नट्स आणि हेल्दी फॅट्स असावेत. यावेळी जंक फूड्स, साखर याचे सेवन करणे टाळावे.
  • इंटरमिटेंट फास्टिंगवेळी अत्याधिक थकवा, चक्कर येणे अशा समस्या उद्भवू शकतात. यावेळी स्वत:ला हाइड्रेट ठेवण्यासह शरिराला उर्जा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय इंटरमिटेंट फास्टिंगवेळी पुर्णपणे उपाशी राहणेही आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
  • इंटरमिटेंट फास्टिंग प्रभावी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्यासाठी योग्य रुटीन फॉलो करणे अत्यावश्यक आहे. याशिवाय रात्री लवकर झोपण्यासह पुरेशी झोप घ्यावी. फास्टिंगवेळी हलकी एक्सरसाइज करावी.
  • इंटरमिटेंट फास्टिंग करताना हळूहळू त्याची सुरुवात करावी. तुम्ही आठवड्यातून दोनदा कमी कॅलरीज असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
  • इंटरमिटेंट फास्टिंगवेळी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. जेणेकरुन हाइड्रेट राहण्यास मदत होईल. 
View post on Instagram
 

 

आणखी वाचा : 

थंडीत Hair Mask मुळे सर्दी-खोकला होतो? वापरा या वस्तू

व्यायामाशिवाय पोटावरील चरबी होईल कमी, करा हे 5 उपाय