सार

Datta Jayanti 2023: मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. कारण या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीला दत्त गुरूंची पूजा केल्याने त्रिदेव यांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. जाणून घेऊया यामागील पौराणिक कथेबद्दल अधिक…

Dattatreya Jayanti 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याचे मोठे महत्त्व आहे. या महिन्यात काही सण-उपवास केले जातात. अशाप्रकारे प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा दत्त जयंती 26 डिसेंबर, 2023 रोजी साजरी केली जाणार आहे.

दत्त जयंती ही त्रिदेवांचा अवतार मानल्या गेलेल्या दत्तांना समर्पित केली जाते. त्रिदेव म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद दत्त जयंतीनिमित्त पूजा केल्याने मिळतो अशी मान्यता आहे. या दिवशी `श्री गुरुदेव दत्त'श्री गुरुदत्त' असा जयघोषही केला जातो.

दत्त जयंतीनिमित्त शुभ मुहूर्त
पंचांगानुसार मार्गशीष पौर्णिमा 26 डिसेंबर, 2023 रोजी पहाटे 05 वाजून 46 मिनिटांनी सुरू होणार आहे. पौर्णिमा दुसऱ्या दिवशी (27 डिसेंबर, 2023) सकाळी 06 वाजून 02 मिनिटांनी संपणार आहे.

पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, एकेकाळी देवी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना आपल्या पतिव्रता धर्माचा खूप गर्व वाटत होता. नारद मुनींना या देवींचा गर्व मोडायचा होता. यासाठी नारद मुनींनी या तिन्ही देवींच्या समोर अनसूयाच्या पतिव्रता धर्माबद्दल कौतुक करण्यास सुरूवात केली. यामुळे तिन्ही देवींना माता अनसूया हीचा मत्सर वाटू लागला होता. यामुळे त्यांनी त्रिवेदांना माता अनसूयाचा पतिव्रता धर्म मोडण्यास सांगितले.

माता अनसूयाला त्रिदेव आपला पतिव्रता धर्म मोडणार असल्याचे आधीच कळले. जेव्हा त्रिदेव अनसूया जवळ पोहोचले तेव्हा तिने अत्रि ऋषींच्या चरणांवर पाणी शिंपडले. यामुळे तिन्ही देव बाल अवस्थेतेत पोहोचले. यानंतर माता अनसूया या तिघांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करू लागली.

या कारणास्तव साजरी केली जाते दत्त जयंती
यानंतर तिन्ही देवींना आपली चूक कळली आणि त्यांनी माता अनसूया हीच्याकडे माफी मागितली. यानंतर तिन्ही देवींनी आपल्या-आपल्या अंशाने एक नवा अंश तयार करत त्याला ‘दत्तात्रेय’ नाव दिले. अशाप्रकारे दत्तांचा जन्म झाला. अशी मान्यता आहे की, दत्तात्रयांनी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला जन्म घेतला होता. याच कारणास्तव दत्त जयंती साजरी केली जाते.

दत्त जयंतीनिमित्त म्हणा हे मंत्र

  • दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
  • ॐ द्रां दत्तात्रेयाय नम:
  • ॐ दिगंबराय विद्महे योगीश्रारय् धीमही तन्नो दत: प्रचोदयात

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

Money Horoscope 2024 : तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांना कोणत्या क्षेत्रात मिळेल यश, नोकरी की व्यवसाय?

Finance Horoscope 2024 : नववर्षात कर्क, सिंह, कन्या राशीपैकी कोण होईल शेअर मार्केटमुळे मालामाल?

पती-पत्नीने एकाच ताटात का जेवू नये? भीष्म पितामह यांनी सांगितलेय गुपित