मुंबईतील गोविंदांनी लुटला दहीहंडीच्या उत्सावाचा आनंद, पाहा PHOTOS
- FB
- TW
- Linkdin
मुंबईत दहीहंडी उत्सवाची धूम
मुंबईत दहीहंडी उत्सवाची मोठी धूम सकाळपासूनच पहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षीच्या दहीहंडीचे काही खास फोटोज समोर आले आहेत.
गोपाळकालांचा आनंद द्विगुणीत
दहीहंडीच्या उत्सवाची प्रत्येक गोविंदा पथकाकडून वाट पाहिली जाते. श्रीकृष्णासह दहीहंडीच्या गाण्यांवर ठेका धरताना गोविंदा पथक दिसून येत आहेत.
श्रीकृष्णाच्या उत्सवात दंगून जाऊ
दहीहंडीच्या वेळी एकोप्याने सर्वजण एकत्रित एक उत्सावाचा आनंद साजरा करतात. वेगवेगळ्या ठिकाणच्या गोविंदा पथकांकडून हंडी फोडण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला जातो.
साहसी खेळाचा दर्जा
दहीहंडीच्या उत्सवाल साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. हा खेळ जगभरात प्रसिद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. याशिवाय सरकारकडून काही गोविंदांना परदेशात आपला खेळ सादर करण्यासाठी प्राधान्यही दिले जाते.
महिला गोविंदा पथकही आग्रही
दहीहंडीला पुरुष मंडळीच नव्हे तर महिला गोविंदा पथकांकडूनही दहीहंडी फोडण्याचा पराक्रम केला जातो. फोटोतील महिला गोविंदा पथकाने सुंदर असा मनोरा रचत सलामी दिली आहे.
आला रे आला गोविंदा आला....
दहीहंडी फोडण्यासाठी रचले जाणारे मानवी मनोरे पाहताना डोळ्याचे पारणे फिटले जाते. गोविंदांना दहीहंडी फोडण्यासाठी अनेकांकडून हातभार लावले जातात.
बालवीराची सलामी
दहीहंडी फोडण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यासाठी बालवीराकडून सलामी देण्यात आली. गोविंदाचा उत्सवाची जशी मुंबईत धूम असते तेवढाच आनंद ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात पहायला मिळते.
आणखी वाचा :
मुंबई-ठाण्यात सर्वाधिक उंच दहीहंडी कुठे? गोविंदांना 50 लाखांचे बक्षीसही मिळणार
मुंबईतील टॉप 9 दहीहंडी पथके कसा करतात थरारक सराव?, जाणून घ्या संपूर्ण माहिती