मुंबई-ठाण्यात सर्वाधिक उंच दहीहंडी कुठे? गोविंदांना 50 लाखांचे बक्षीसही मिळणार
- FB
- TW
- Linkdin
दहीहंडी 2024
कृष्णजन्माष्टमीच्या निमित्त दुसऱ्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या दहीहंडीचा उत्सव मुंबई आणि ठाण्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा दहीहंडीचा उत्सव 27 ऑगस्टला साजरा केला जात आहे. दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथकांकडून उंचचउंच मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. दहीहंडीसाठी गोविंदा पथकांकडून उत्सवाच्या एक ते दोन महिने आधीच सराव सुरु केला जातो. अशातच मुंबई आणि ठाण्यातील सर्वाधिक मोठी दहीहंडी कुठे असते आणि लाखोंचे बक्षीस कुठे ठेवण्यात आलेय याबद्दल जाणून घेऊया…
मनसे दहीहंडी उत्सव
ठाणे- मनसे दहीहंडी उत्सव
आयोजक- मनसे नेते अविनाश जाधव
कुठे - भगवती मैदान, विष्णु नगर, नौपाडा, ठाणे
संस्कृती प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव
ठाणे- संस्कृती प्रतिष्ठान
आयोजक - आमदार प्रताप सरनाईक
कुठे - ठाणे महापालिका स्कूल पटांगण, वर्तक नगर, ठाणे
संस्कृती प्रतिष्ठानकडून यंदा 9 थरांचा विक्रम रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.
मुंबईतील मानाच्या दहीहंडी
धारावीत 11 लाख 111 रुपयांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विक्रोळीत मनसे आणि शिवसेनेकडून लाखो रुपयांचे बक्षीस लावल्या जाणाऱ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प्रसिद्ध कलाकार उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांची मानाची हंडी
ठाणे- धर्मवीर आनंद दिघे यांची मानाची हंडी
आयोजनक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कुठे- टेंभी नाका, ठाणे
मुंबई, वरळी - जांभोरी मैदान
मुंबईतील वरळीतील जांभोरी मैदानात भाजपकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. येथे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदापथकाला 50 लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय वरळीत हनुमान मैदान, वीर जिजामातानदर येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दहीहंडीच्या उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
साई जलाराम प्रतिष्ठानची दहीहंडी
ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकूम जकात नाका येथे साई जलाराम प्रतिष्ठानकडून दहीहंडीचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
राम कदम दही हंडी
मुंबईतील दहीहंडीमध्ये भाजपाचे आमदार राम कदम यांनी पुन्हा भारतातील सर्वाधिक मोठी दहीहंडीचे आयोजन करण्याचा दावा केला आहे. यामध्ये किती बक्षीस मिळणार हे समोर आलेले नाही.
कुठे- घाटकोपर श्रेयस सिग्नल
आणखी वाचा :
मुंबईतील टॉप 9 दहीहंडी पथके, जाणून घ्या त्यांची खासियत
Dahi Handi 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास Messages पाठवून साजरा करा गोविंदा