Coral Gemstone Benefits : कोणकोणत्या राशीला होतो पोवळे हे रत्न धारण केल्याचा लाभ?
मुंबई - ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कुंडलीत मंगळ कमजोर असतो किंवा त्याचे वाईट परिणाम जाणवत असतात तेव्हा पोवळे (प्रवाळ) हा रत्न धारण करावा, असे सांगण्यात आले आहे. जाणून घ्या सविस्तर.

लाल प्रवाळ रत्न:
कुंडलीमध्ये मंगळ कमजोर असल्यास किंवा त्याचे वाईट परिणाम जाणवत असल्यास प्रवाळ रत्न धारण करावे असे ज्योतिषी सांगतात. आता कोणी प्रवाळ धारण करावे आणि त्याचे काय फायदे होतात ते पाहूया. प्रवाळ हे मंगळ ग्रहाचे रत्न आहे. मंगळ हा शक्ती, धैर्य आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. पोलीस, लष्कर, नेतृत्व, राजकारण, वैद्यकीय आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील लोकांसाठी हे रत्न खूप फायदेशीर आहे.
मेष:
मेष राशीच्या लोकांनी प्रवाळ धारण केल्यास त्यांच्या मंगळाची शक्ती वाढते आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यांना आकर्षक व्यक्तिमत्त्व प्राप्त होते. काही आरोग्य समस्याही कमी होतात.
वृश्चिक:
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ हा लग्नाचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी प्रवाळ धारण करणे चांगले.
सिंह:
सिंह राशीच्या लोकांसाठी मोती भाग्यवान असते. त्यांच्या कष्टाला अपेक्षित फळ मिळत नसल्यास हे रत्न धारण करणे चांगले. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल होते.
काय फायदा होतो
प्रवाळ धारण केल्याने भीती आणि तणाव कमी होतो. आळस आणि मानसिक समस्या दूर करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
रक्ताशी संबंधित समस्या: रक्ताशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना प्रवाळ धारण केल्याने आराम मिळतो.
कसे धारण करावे: पुरुषांनी उजव्या हाताच्या अनामिकेत प्रवाळाची अंगठी घालावी, तर महिलांनी डाव्या हाताच्या अनामिकेत प्रवाळाची अंगठी घालावी.
