Chandipura Vesiculovirus कसा फैलावतो? जाणून घ्या लक्षणांसह अन्य महत्वाची माहिती

| Published : Jul 15 2024, 04:59 PM IST / Updated: Jul 15 2024, 05:01 PM IST

virus

सार

राजस्थानमध्ये चांदीपुरा व्हायरसची एण्ट्री झाली आहे. यामुळे एका मुलाचा गुजारातमधील हिम्मतनगर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. अशातच चांदीपुरा व्हायरस नक्की काय आहे, लक्षणे आणि कसा फैलावतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Chandipura Vesiculovirus : राजस्थानमधील उदेपुरच्या आदिवासी परिसारात चांदीपुरा व्हायरची दोन मुलांमध्ये लक्षणे आढळून आली होती. यापैकी एका मुलाचा गुजरातमधील हिम्मतनगर रुग्णालयात उपचारादरम्यान मृतयू झाला. याशिवाय उदयपूरमधील चार वर्षाच्या आणखी एका मुलाचा व्हायरसच्या लक्षणांमुळे रुग्णालयात भरती असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.

चांदीपुरा व्हायरस 14 वर्षाखालील मुलांमध्ये शिरकाव करत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हायरस थेट मुलांच्या मेंदूवर परिणाम करतो. यामुळे सर्वप्रथम मुलांमध्ये ताप येण्यासारखी लक्षणे दिसून येतात. यानंतर मुलं कोमामध्ये जाण्याची शक्यता वाढली जाते. दरम्यान, हिम्मतनगर रुग्णालयात जून आणि जुलै महिन्यादरम्यान एकूण चार मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.

वयाच्या 2 ते 9 वर्षामधील मुलांना व्हायरसचा त्रास
हिम्मतनगर रुग्णालयातील पहिले प्रकरण 27 जूनला राजस्थानमधील उदेपुर जिल्ह्यातील खेरवाडा जिल्ह्यातील पलेचा गावातील समोर आले. येथील चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. यानंतर 5 जुलैला अरवल्ली जिल्ह्यातील भिलोडाच्या मोटा कंथारियामधी 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. 9 जुलैला साबरकांठा जिल्ह्यातील कोडारिया गावातील पाच वर्शीय मुलगा आणि अरवल्ली जिल्ह्यातील तानपुरातील दोन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे 17 दिवसांमध्ये चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

चांदीपुरा व्हायरसची लक्षणे
चांदीपुरा व्हायरसमध्ये मुलांच्या मेंदूवर थेट परिणाम होतो. यामुळे मेंदूला सूज येते. सुरुवातीला मुलामध्ये तापासारखी लक्षणे दिसून येतात. पण नंतर मुलं थेट कोमामध्ये जाते.

कसे पडले नाव?
चांदीपुरा व्हायरस नाव महाराष्ट्रातील एका लहान गावाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. चांदीपुरा व्हायरसचे पहिले प्रकरण वर्ष 1965 मध्ये समोर आले होते.

कसा फैलावतो व्हायरस?
चांदीपुरा व्हायरस सर्वसामान्यपणे 14 वर्षाखालील लहान मुलांना होत असल्याची प्रकरणे समोर आली आहे. व्हायरल डास आणि मोठ्या माशांच्या माध्यमातून फैलावला जातो. सेंड फ्लाय नावाच्या माशीची अशी एक प्रजाती आहे जी चिखलात आढळते. पावसाळ्याच्या दिवसात सेंड फ्लाय माशांची संख्या वेगाने वाढली जाते.

आणखी वाचा :

पिझ्झासाठी वापरल्या जाणाऱ्या Oregano चे आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात घरातील लाल मुंग्या होतील गायब, करा हे 5 सोपे उपाय