Lifestyle

पावसाळ्यात घरातील लाल मुंग्या होतील गायब, करा हे 5 सोपे उपाय

Image credits: Instagram

लाल मुंग्यांपासून दूर राहण्यासाठी उपाय

पावसाळ्यात घरातील कोपऱ्यांमधून लाल मुंग्या बाहेर पडू लागतात. किचमध्ये अन्नपदार्थांचे कण पडल्यास लाल मुंग्या तेथे जमा होतात. यावर उपाय काय हे पुढे पाहूया…

Image credits: Instagram

मीठ आणि व्हिनेगर

व्हिनेगरचा गंध मुंग्यांना आवडत नाही. यामुळे मीठ आणि व्हिनेगरचे पाणी तयार करुन त्याने किचनच्या टाइल्स, फरशी अथवा आजूबाजूच्या ठिकाणी पुसून घ्या.

Image credits: freepik@8photo

काळी मिरी आणि हळद

काळी मिरी आणि हळद पावडर पाण्यात मिक्स करुन उकळून घ्या. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरुन घराच्या कानाकोपऱ्यासह खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवता तेथे शिंपडा. यामुळे लाल मुंग्या दूर होतील.

Image credits: Instagram

लाल मिरची पेस्ट

लाल मिरचीचा गंध लाल मुंग्यांना अजिबात आवडत नाही. यामुळे मिरचीची पेस्ट तयार करुन पाण्यात उकळवून त्याचा स्प्रे तयार करा. यामुळे पावसाळ्यात घरात येणाऱ्या लाल मुंग्या गायब होतील.

Image credits: Facebook

हा देखील उपाय करा

मार्केटमध्ये किडे-मुंग्यांना घरातून पळवण्यासाठी वेगवेगळे स्प्रे अथवा खडू येतात. याचा वापरही घरातील लाल मुंग्या दूर करण्यासाठी करू शकता.

Image credits: Facebook