MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, या 4 परिस्थितीत शांत राहणंच हुशारीचं काम

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, या 4 परिस्थितीत शांत राहणंच हुशारीचं काम

चाणक्य नीती : माणसाच्या शब्दांमध्ये खूप ताकद असते. एक शब्द मन जिंकू शकतो, तर दुसरा कधीही न भरणारी जखम देऊ शकतो. त्यामुळे कधी बोलावं आणि कधी गप्प राहावं हे समजणं महत्त्वाचं आहे. चाणक्य नीतीनुसार, ४ अशा परिस्थिती आहेत जिथे शांत राहणंच फायद्याचं ठरतं.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 14 2026, 06:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
चाणक्य नीतीनुसार शांत राहण्याचे प्रसंग
Image Credit : Asianet News

चाणक्य नीतीनुसार शांत राहण्याचे प्रसंग

माणसाच्या शब्दांमध्ये मोठी ताकद असते. पण विचार न करता बोलल्यास गैरसमज आणि नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आचार्य चाणक्य सांगतात की, काही प्रसंगी आपलं मत लगेच व्यक्त न करता शांत राहिल्याने आपला सन्मान आणि मनःशांती टिकून राहते. चला तर मग पाहूया, कोणत्या परिस्थितीत गप्प बसणं हुशारीचं ठरतं.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
जेव्हा समोरची व्यक्ती रागात असेल
Image Credit : AI

जेव्हा समोरची व्यक्ती रागात असेल

जेव्हा एखादी व्यक्ती रागात असते, तेव्हा तिची विचार करण्याची क्षमता सामान्य नसते. अशावेळी आपण कितीही चांगली गोष्ट सांगितली तरी ती चुकीच्या पद्धतीने घेतली जाऊ शकते. उलट आपणही रागाने उत्तर दिल्यास वाद वाढतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या रागावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा. परिस्थिती शांत झाल्यावर बोलल्यास समस्या सहज सुटते.

Related Articles

Related image1
Chanakya Niti : आयुष्यात 'हे' 5 प्रकारचे लोक सहज फसतात; सावध राहण्यासाठी एकदा या गोष्टी वाचाच
35
ज्या व्यक्ती तुमच्या शब्दांना किंमत देत नाहीत
Image Credit : Gemini AI

ज्या व्यक्ती तुमच्या शब्दांना किंमत देत नाहीत

प्रत्येकाला आपल्या विचारांशी सहमत करणं गरजेचं नाही. काही लोक सत्य जाणून घेण्यासाठी नाही, तर केवळ वाद घालण्यासाठी बोलतात. अशा लोकांना कितीही समजावून सांगितलं तरी ते आपलं मत बदलत नाहीत. यात आपला वेळ आणि शक्ती दोन्ही वाया जाते. प्रत्येक वादात जिंकण्यापेक्षा त्यातून बाहेर पडणं कधीही चांगलं. जिथे गरज आहे तिथेच बोला आणि बाकी ठिकाणी शांत राहा.
45
भविष्यातील योजनांबद्दल बोलताना
Image Credit : AI

भविष्यातील योजनांबद्दल बोलताना

आपण आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचं ठरवतो, तेव्हा ते लगेच सगळ्यांना सांगण्याऐवजी ते काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. आपल्या योजना आणि विचार सगळ्यांसोबत शेअर केल्यास काही लोकांकडून अनावश्यक टीका किंवा निरुत्साही करणारे शब्द ऐकायला मिळू शकतात. त्यामुळे शांतपणे आपलं काम करा आणि तुमचं यशच बोलू द्या. हेच खरं शहाणपण आहे.
55
जेव्हा तुम्हाला एखादे गुपित कळते
Image Credit : Gemini

जेव्हा तुम्हाला एखादे गुपित कळते

जेव्हा कोणी आपल्यावर विश्वास ठेवून एखादी गोष्ट सांगतं, तेव्हा ती इतरांना सांगून त्यांचा विश्वासघात करू नका. आपल्याला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. कोणती गोष्ट बाहेर सांगावी आणि कोणती गोष्ट स्वतःजवळ ठेवावी, हे ज्याला कळतं तोच आयुष्यात चांगली नाती जोडू शकतो, असं चाणक्य सांगतात.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Surya Mangal Yog : 15 सप्टेंबरला सूर्य-मंगळ युती, 'या' 4 राशींची कमाई वाढणार, नशीब साथ देणार
Recommended image2
Hydrating Fruits : शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी खा 'ही' 7 फळं
Recommended image3
Olive Oil : ऑलिव्ह ऑईलने खरंच गुड कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या 7 फायदे
Recommended image4
Kidney Health : किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज प्या 'हा' चहा, मिळतील अनेक फायदे
Recommended image5
Mosquito Repellent : डासांपासून सुटका हवीये? घरात लावा ही 5 झाडं, नैसर्गिकरित्या त्रास होईल कमी
Related Stories
Recommended image1
Chanakya Niti : आयुष्यात 'हे' 5 प्रकारचे लोक सहज फसतात; सावध राहण्यासाठी एकदा या गोष्टी वाचाच
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved