दैनंदिन पदार्थातून कॅन्सर होण्याची शक्यता ? तज्ज्ञांचा सल्ला काय ? वाचा सविस्तर

| Published : May 08 2024, 11:11 AM IST / Updated: May 08 2024, 01:06 PM IST

junk food

सार

कॅन्सर सारखे आजार सध्या देशातील मोठ्या समस्या आहेत. अनेकांना कॅन्सर सारख्या आजारांनी ग्रासले असून याचे कारण कदाचित तुमच्या दैनंदिन जेवणाच्या पदार्थामधून असू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला. 

कॅन्सर सारखे आजार सध्या देशातील मोठ्या समस्या आहेत. अनेकांना कॅन्सर सारख्या आजारांनी ग्रासले असून याचे कारण कदाचित तुमच्या दैनंदिन जेवणाच्या पदार्थामधून असू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.तज्ज्ञांनी म्हंटले आहे की, तुम्ही दैनंदिन जीवनात ज्या पदार्थांचे सेवन करतात, ते दिसायला आणि खायला स्वादिष्ट असते. मात्र हे पदार्थ आरोग्याला हानिकारक असून देखील ते खाल्ले जातात.

या वर्षीच्या सुरुवातीला अमेरिकन कॅन्सर सोसायटीने अहवाल दिला की ५५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना कोलोरेक्टल कॅन्सरचे निदान झाले आहे. आजच्या घडीला त्याची संख्या दुपटीने वाढली आहे.त्यामुळे काही खाद्यपदार्थांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे पदार्थ पूर्णपणे टाळावेत का ?आहारतज्ज्ञांनी काही पाच घटक सांगितले आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते कसे टाळावे जेणे करून निरोगी राहता येईल जाणून त्या बद्दल

हे पदार्थ टाळावे :

लाल मांस :

कोणत्याही प्रकारचे लाल मांस सेवन केल्यास हे कोलोरेक्टल कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात. हार्वर्ड हेल्थच्या मते, विविध अभ्यासकांनी सुचवले आहे की, मांसाचे जास्त सेवन केल्याने कोलन कॅन्सर प्रकारचा धोका वाढतो. कारण यामध्ये फॅट्स आणि सोडियमचे प्रमाण असते म्हणून.या वितिरिक्त आहारतज्ज्ञ शिफारस करतात की आठवड्यातून १८ औन्स लाल मांसाचे सेवन करावे. तसेच ते कोणत्या तापमानात शिजवले गेले याची देखील नोंद घेतली जाते. कारण कॅन्सरचा धोका वाढू नये म्हणून याची खबरदारी घेतली जाते.

दारू :

अनेकांना दारूची सवय असते. खरं तर मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत अनेकदा व्यक्ती दारू पितो, मात्र याचा दुष्परिणाम नंतर कळायला लागतो. दारूच्या सेवनाचा जास्त धोका तरुणांना आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. दारूच्या सेवनाने पोट, आतडी, अन्ननलिका,लिव्हर, स्तनाचा कॅन्सर होतो. कालांतराने दारूमुळे अनेकदा टिशू डॅमेज होतात आणि त्याचा परिणाम शरीराला भोगावा लागतो.

साखरयुक्त थंड पेय :

उन्हळ्यात बहुतेक लोक साखरयुक्त थंड पेय पितात. यावर हार्डवर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेअल्थच्या मते, ज्या स्त्रिया दिवसातून दोन पेक्षा जास्त साखरयुक्त पेय पितात त्यांना कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका अधिक आहे. या शीत पेयांमुळे तुमचे वजन वाढू शकते आणि लठठ पण येतो. हे कॅन्सरचे मुख्य कारण असू शकते.

डेअरी :

अनेक अभ्यास सांगतात की दुग्धजन्य पदार्थामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. दूध, चीज आणि दही यासारख्या पदार्थांचे जास्त सेवन केल्याने संशोधनानुसार, दुग्धशाळेमुळे इन्सुलिन सारखी ग्रोथ फॅक्टर 1 (IGF-1) ची पातळी वाढते, जी प्रोस्टेट कॅन्सरशी संबंधित आहे. IGF-1 प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींचा प्रसार यामुळे वाढतो.

आणखी वाचा :

प्रेमानंद महाराजांनी दिलाय सकाळी लवकर उठण्यासाठी 'हा' सल्ला , या युक्तीने तुमचे डोळे आपोआप उघडतील

दिवसभर आळस आल्यासारखा वाटतंय ? मग हे 2 योगासने नियमित करून पहा