Buddha Purnima 2024 : यंदा बुद्ध पौर्णिमा कधी साजरी केली जाणार? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्तासह विशेष महत्त्व

| Published : May 13 2024, 01:21 PM IST / Updated: May 13 2024, 01:23 PM IST

Buddha Purnima
Buddha Purnima 2024 : यंदा बुद्ध पौर्णिमा कधी साजरी केली जाणार? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्तासह विशेष महत्त्व
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Buddha Purnima : वैशाख महिन्यादरम्यान बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धांची जयंती साजरी केली जाते. जाणून घेऊया यंदाच्या वर्षात बुद्ध पौर्णिमा कधी साजरी केली जाणार याबद्दल सविस्तर...

Buddha Purnima 2024 Date and Shubh Muhurat : भगवान बुद्धांचा जन्म वैशाख महिन्यातल पौर्णिमेला झाला होता. देशभरात बुद्ध पौर्णिमेला बुद्ध अनुयायी बुद्ध पौर्णिमा मोठ्या आनंदात साजरी करतात. हिंदू धर्मात गौतम बुद्धांना भगवान श्री विष्णूंचा नववा अवतार असल्याचे मानले जाते. जाणून घेऊया यंदाच्या वर्षी बुद्ध पौर्णिमा कधी, शुभ मुहूर्त आणि विशेष महत्त्वाबद्दल अधिक.

बुद्ध पौर्णिमा तिथी आणि शुभ मुहूर्त
वैदीक पंचांगानुसार, बुद्ध पौर्णिमेची तिथी संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी सुरू होणार असून 23 मे गुरुवारी सकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी समाप्त होणार आहे. म्हणजेच बुद्ध पौर्णिमा 23 मे ला साजरी केली जाणार आहे.

का साजरी केली जाते बुद्ध पौर्णिमा?
बुद्ध पौर्णिमा भगवान बुद्धांचा जन्म, सत्याचे ज्ञान आणि महापरिनिर्वाणच्या रुपात मानली जाते. बुद्ध पौर्णिमा केवळ बुद्धांच्या जन्माशी संबंधित नसून अनेक वर्ष वनांमध्ये फिरत कठोर तपस्या करत बोधगया येथे बोधिवृक्षाखाली बुद्धांना ज्ञानप्राप्ती केल्यासंबंधितही आहे.

गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करत जगाला शांती, सत्य आणि मानवतेच्या सेवेचा संदेश दिला होता. याशिवाय पंचशीलेही दिली. ही पंचशीले म्हणजे व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे, चोरी न करणे, हिंसा न करणे आणि मादक पदार्थांचे सेवन करू नये.

गौतम बुद्धांचे आयुष्य
गौतम बुद्ध आध्यात्मिक गुरु, शिक्षक आणि मार्गदर्शक होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. गौतम बुद्धांचे अनुयायी संपूर्ण जगभरात आहेत. गौतम बुद्धांचा जन्म आणि मृत्यूची वेळ अनिश्चित आहे. दरम्यान, बहुतांश इतिहासकार गौतम बुद्धांचा जीवनकाळ 563-483 ईसवी सनाच्या आधीदरम्यान असल्याचे सांगतात. याशिवाय बहुतांशजण लुंबिनी, नेपाळला बुद्धांचे जन्मस्थान मानतात.

गौतम बुद्धांचा मृत्यू वयाच्या 80 व्या वर्षात उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे झाला होता.यामुळेच बौद्ध धर्मातील बोधगया ठिकाण पवित्र असल्याचे मानले जाते. अन्य तीन महत्त्वाची तीर्थ क्षेत्र म्हणजे कुशीनगर, लुंबिनी आणि सारनाथ आहे. असे मानले जाते की, गौतम बुद्धांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली होती आणि त्यांनी सर्वप्रथम सारनामध्ये धर्माची शिकवण दिली.

आणखी वाचा : 

Char Dham Yatra हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कशी कराल? बुकिंग, भाड्यासह जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

Char Dham Yatra 2024 : चारधाम यात्रेला जाणार आहात? या 7 गोष्टींची घ्या काळजी