- Home
- lifestyle
- Sesame Seeds : पांढरे तीळ की काळे तीळ? दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि कोणते खाणे जास्त फायदेशीर?
Sesame Seeds : पांढरे तीळ की काळे तीळ? दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि कोणते खाणे जास्त फायदेशीर?
Sesame Seeds: तीळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हिवाळ्यात त्यांचे सेवन केल्याने शरीराला अधिक फायदा मिळतो. पण, पांढरे तीळ आणि काळे तीळ यापैकी नेमके कोणते तीळ निवडणे जास्त योग्य ठरेल?

काळे तीळ की पांढरे तीळ?
आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असणाऱ्या तिळाचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. अन्नाला चव आणि वेगळाच पोत देण्यात तीळ आघाडीवर असतात. पण बाजारात आपल्याला पांढरे आणि काळे दोन्ही प्रकारचे तीळ दिसतात. त्यांच्यात फक्त रंगाचाच फरक नसून चव, स्वयंपाकात वापरण्याची पद्धत आणि मुख्य म्हणजे पोषणमूल्यांमध्येही खूप मोठा फरक आहे. मग या दोन्हीचा वापर कसा करायचा? कोणत्या तिळापासून जास्त फायदे मिळतात?

१. चवीचा विचार केला तर...
पांढरे तीळ: यांची चव सौम्य आणि हलकी असते. सॅलड्स, ब्रेड आणि स्टिर-फ्राय पदार्थांसाठी हे अगदी योग्य ठरतात. इतर घटकांच्या चवीला न दाबता हे त्यांच्यात छान मिसळून जातात.
काळे तीळ: यांची चव अधिक तीव्र आणि खोल असते. एशियन डेझर्ट्स, सॉस आणि मॅरिनेशनच्या पदार्थांना हे एक खास चव देतात.
२. पोत आणि टेक्स्चर...
पांढरे तीळ: सहसा यांची साल काढलेली असते. त्यामुळे ते थोडे मऊ आणि चावायला सोपे असतात, बेकिंग आयटम्समध्ये ते उत्तम चव देतात.
काळे तीळ: हे सालीसह असतात. त्यामुळे ते थोडे खडबडीत लागतात आणि चावताना क्रंचीनेस येतो.
सजावटीसाठी...
पांढरे तीळ क्लासिक लूक देतात, तर काळे तीळ पांढऱ्या भातावर किंवा क्रीमी डेझर्ट्सवर वापरल्यास एक अप्रतिम कॉन्ट्रास्ट लूक देऊन रेस्टॉरंट स्टाईल फिल देतात.
काळे तीळ की पांढरे तीळ? कोणते आहेत सर्वोत्तम?
पोषक तत्वांचा विचार केला तर काळ्या तिळाचीच बाजी मारतात असे म्हणावे लागेल. या दोन्ही प्रकारच्या तिळांमध्ये निरोगी चरबी आणि खनिजे असली तरी, काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला तुमच्या शरीराला जास्त पोषक तत्वे, विशेषतः मजबूत हाडांसाठी कॅल्शियम मिळवून द्यायचे असेल, तर काळ्या तिळाची निवड करणे खूप चांगले. मात्र, पांढरे तीळ रोजच्या साध्या स्वयंपाकात वापरता येतात. दोन्ही एकत्र वापरले तर चवीबरोबरच अप्रतिम पोषणही मिळते.
तीळ साठवताना घ्यायची काळजी - तिळामध्ये नैसर्गिकरित्या तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. ते हवाबंद डब्यात, थंड आणि कोरड्या जागी साठवावेत. विशेषतः काळे तीळ लवकर खराब होतात, त्यामुळे जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये ठेवणे उत्तम. स्वयंपाकात वापरण्यापूर्वी ते मंद आचेवर ड्राय रोस्ट केल्यास त्यांचा सुगंध आणि चव दुप्पट होते. पण ते करपणार नाहीत याची काळजी घ्या, नाहीतर ते कडू लागतील. थोडे गरम करून खाल्ल्यास तुम्हाला पोषणही मिळेल.
