- Home
- lifestyle
- Crow Nature Facts : पिसांमध्ये लपलेले सुक्ष्म जंतू, बॅक्टेरिया मारण्यासाठी कावळे मुंग्यांची घेतात मदत
Crow Nature Facts : पिसांमध्ये लपलेले सुक्ष्म जंतू, बॅक्टेरिया मारण्यासाठी कावळे मुंग्यांची घेतात मदत
मुंबई - प्रत्येक आजारावर नैसर्गिक उपचार पद्धती आहे. प्राणी, पक्षी आणि इतर जिवांना ती माहिती आहे. या पद्धतीचा वापर करुन कोणत्याही आजारापासून सुटका करुन घेता येते. कावळे पिसांमधील बॅक्टेरिया, सुक्ष्म जीव मारण्यासाठी मुग्यांचा वापर करतात. जाणून घ्या…

कावळ्यांचे अद्भुत जग
निसर्ग फार अद्भुत आहे जिथे प्रत्येक कृतीला एक अर्थ आहे. माणसाने ते बारकाईने समजून घेतले पाहिजे. माणूस आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो, पण वन्यजीव आजारी पडल्यावर स्वतःच्या पद्धतीने उपचार करतात. पाळीव प्राण्यांसह इतर सर्व प्राणी स्वतःच्या आजारपणावर स्वतःच उपचार करतात. कावळे आजारी पडल्यावर काय करतात हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. त्याबद्दलची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
आयुर्वेदिक औषधींचा वापर
पूर्वी लोक आजारी पडल्यावर निसर्गात मिळणाऱ्या आयुर्वेदिक औषधींचा वापर करायचे. या सर्व औषधी वनस्पतींपासून बनवल्या जायच्या. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नव्हते. आंघोळीसाठीही आजच्यासारखे रासायनिक साबण-शॅम्पू वापरले जात नव्हते. तरीही पूर्वीच्या लोकांचे आरोग्यही चांगले राहायचे.
पारंपरिक उपचार पद्धतींचाच वापर
काळानुसार आधुनिकतेच्या रेट्यात लोक कोणतेही साबण-शॅम्पू वापरतात. त्याचे विपरित परिणाम तुम्ही पाहू शकता. पण प्राणी आजारी पडल्यावर त्यांच्या पारंपरिक उपचार पद्धतींचाच वापर करतात. कावळे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
कावळ्यांची बुद्धिमत्ता दोन वर्षांच्या मुलांएवढी
मगर दात स्वच्छ करण्यासाठी लहान पक्ष्यांना जबड्यात येऊ देतो, तसेच कावळे आजारी पडल्यावर मुंग्यांजवळ जातात. संशोधनातून सिद्ध झाले आहे की कावळे हे बुद्धिमान पक्षी आहेत. त्यांची बुद्धिमत्ता दोन वर्षांच्या मुलांएवढी असते. कावळे उत्तम आरोग्यासाठी मुंग्यांजवळ जातात हे ऐकायला रंजक आहे.
निपचित पडून राहतात
मेलेल्या कावळ्यांना मुंग्यांनी वेढलेले तुम्ही पाहिले असेल. पण इथे तसे नाही. जिवंत कावळे आपले आरोग्य सुधारण्यासाठी मुंग्यांचा शोध घेतात. त्या ठिकाणी निपचित पडून राहतात. मुंग्या कावळ्याच्या शरीरावर चढतात. त्याच्या शरीरावर असलेले सुक्ष्म जीव आणि बॅक्टेरिया खातात. त्यामुळे कावळ्यांची यापासून सुटका होते. शिवाय मुग्यांनाही खाद्य मिळते. मुंग्यांच्या चाव्याने कावळ्यांच्या शरीरातील परजीवी, बुरशी आणि हानिकारक जिवाणू नष्ट होतात. पक्ष्यांच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
अॅंटींग म्हणजे काय?
याला अॅटिंग म्हणतात. केवळ कावळेच नाही तर इतर पक्षीही असे करतात. मुंग्यांजवळ निपचित पडून राहतात. मुग्यांना त्यांच्या शरीरावर चढून सुक्ष्म जीव आणि बॅक्टेरिया खाऊ देतात. त्यामुळे दोघांचाही फायदा होतो. आता या नैसर्गिंक प्रक्रियेला काय म्हणावे. नैसर्गिंक आश्चर्यांपैकी ही एक पद्धत आहे.

