- Home
- lifestyle
- Relationship Guide : सर्वकाही सुरळीत सुरु असताना पत्नी अचानक पतीला धोका का देते? सर्वेक्षणात समोर आली ही ४ कारणे
Relationship Guide : सर्वकाही सुरळीत सुरु असताना पत्नी अचानक पतीला धोका का देते? सर्वेक्षणात समोर आली ही ४ कारणे
मुंबई : आजकाल मुंबई-पुण्यासारखे मेट्रो शहरच नाही तर लहान मोठ्या गावांमध्येही लग्न झालेल्या महिला परपुरुषाचा विचार करतात. त्यांच्याशी सर्व प्रकारचे संबंध ठेवतात. पण असे का होते याचा आम्ही शोध घेतलाय. पुढे सविस्तर माहिती जाणून घ्या..

अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील नॅशनल ओपिनियन रिसर्च सेंटर (NORC) च्या २०२२ ग्लोबल सोशल सर्वे (GSS) मध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या. या सर्वेक्षणात २० टक्के पुरुष आणि १३ टक्के महिलांनी आपल्या जोडीदाराला फसवल्याचे कबूल केले. २०१० मध्ये बायकांनी नवऱ्यांना फसवण्याचे प्रमाण २० वर्षांपूर्वीपेक्षा ४० टक्के जास्त आढळले. प्रश्न असा आहे की महिलांच्या स्वभावात इतका मोठा बदल कसा येत आहे. यामागे ४ कारणे सांगितली जातात.
१. कमी आत्मसन्मान
घरात नवऱ्याकडून बायकोला जर सन्मान मिळत नसेल तर महिला लक्ष वेधण्यासाठी बाहेर पाहू लागतात. सन्मान मिळवण्याच्या इच्छेने त्या बाहेरील लोकांकडे पाहू लागतात. अशावेळी दुसऱ्या पुरुषाशी त्यांचे जवळीक वाढते. हळूहळू मनाची स्थिती बदलते. त्यामुळे बायकोला घालून टाकून बोलू नका. ती काय म्हणते ते नीट ऐकून घ्या. त्यानंतरच तुमचे उत्तम मांडा.
२. एकटेपणा
नवरा जर बायकोला जास्त लक्ष देत नसेल, तिच्यासोबत वेळ घालवत नसेल तर अशा परिस्थितीतही बायको बेवफा होऊ शकते. पुरुषांपेक्षा महिला जास्त भावनिक असतात. जर नवरा तिचा आधार बनत नसेल तर भावनिक अंतर निर्माण होऊ लागते आणि बायको दुसऱ्या व्यक्तीसोबत भावनिक आणि शारीरिक संबंधांची कल्पना करू लागते.
३. राग किंवा सूड
काही महिला लग्न करताना त्यांच्या मनात जोडीदाराची एक वेगळीच प्रतिमा असते. पण जेव्हा जोडीदार त्यांच्या अपेक्षांनुसार वागत नाही तेव्हा हळूहळू त्यांच्या मनात कटुता येऊ लागते. त्या दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतात. जर मुलीचे मर्जीशिवाय लग्न झाले असेल तर अशा परिस्थितीतही प्रतारणेची शक्यता वाढते.
४. शारीरिक गरज
जर एखादी महिला आपल्या नवऱ्याकडून समाधानी नसेल तर काही काळ ती स्वतःला आवरते. पण हळूहळू तिचे मन दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ लागते. तिला शारीरिक संबंध, सहानुभूती, कौतुकाची आस असते आणि अशावेळी ती दुसर्या पुरुषाच्या दिशेने वाटचाल करते.

