- Home
- lifestyle
- Bhadrapad Amavasya 2025 : भाद्रपद अमावस्या 22 की 23 ऑगस्ट? जाणून घ्या योग्य तारखेसह स्नान-दानाचा मुहूर्त
Bhadrapad Amavasya 2025 : भाद्रपद अमावस्या 22 की 23 ऑगस्ट? जाणून घ्या योग्य तारखेसह स्नान-दानाचा मुहूर्त
मुंबई : भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पितरांची पूजा आणि स्नान-दानाचे फार महत्व आहे. अशातच भाद्रपद महिन्यातील अमावस्या कधी हे जाणून घ्या.

पितरांची पूजा
पितरांसाठी असणाऱ्या अमावस्येला हिंदू धर्मात फार महत्व आहे. या दिवशी पितृ लोकातून पृथ्वीवर पितरांचे आगमन होते असे मानले जाते. अशातच यंदाच्या वर्षातील भाद्रपद अमावस्या अतिशय महत्वाची आहे. पण हीच अमावस्या येत्या 22 ऑगस्ट की 23 ऑगस्ट असणार यावरुन कंफ्यूजन आहे. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.
भाद्रपद अमावस्या कधी?
भाद्रपद अमावस्या 22 ऑगस्टला सकाळी 11.55 पासून सुरू होणार असून 23 ऑगस्टला सकाळी 11.35 मिनिटांनी संपणार आहे. अशातच भाद्रपद महिन्यातील अमावस्या 23 ऑगस्टला असणार आहे.
शनिश्चरी अमावस्या
भाद्रपद अमावस्येवेळी शनिवार असल्याने याला शनिश्चरी अमावस्या असेही म्हटले जाईल. शनिवारी सुर्योदयावेळी भाद्रपद अमावस्या असेल. यामुळे तीर्थ स्नान आणि दान अतिशय खास असेल. या वेळी केलेले शुभ कार्ये यांचे पुण्य तुम्हाला लाभते असे मानले जाते.
अमावस्यावेळी करा ही कामे
- अमावस्येवेळी सकाळी लवकर उठून एखाद्या नदी, जलाशय किंवा कुंडात स्नान करा. यानंतर सुर्यदेवाला अर्घ्य द्या.
- -अमावस्येवेळी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावा. यानंतर पितरांसाठी प्रार्थना करा. यानंतर पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारा.
- नदी किनारी पितरांच्या आत्मशांतीसाठी पिंडदान करू शकता. यासाठी एखादा गरीब किंवा ब्राम्हणाला दान-दक्षिणा द्या.
- या दिवशी कालसर्प निवारणासाठी पूजा-पाठ करू शकता.
- अमावस्या शनिदेवांचा दिवस मानला जातो. यामुळे त्यांची पूजा केल्याने शनी दोष शांत होऊ शकतो.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

