Premature Grey Hair : कमी वयात केस पांढरे होतायत? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा
वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना सतावतेय. यामुळे अनेकांचा आत्मविश्वासही कमी होतो. अकाली केस पांढरे होणे टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही सोपे उपाय करू शकता.

काही सोपे घरगुती उपाय
वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना सतावतेय. यामुळे अनेकांचा आत्मविश्वासही कमी होतो. अकाली केस पांढरे होणे टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही सोपे उपाय करू शकता.

कढीपत्त्याचं तेल
तुम्ही कढीपत्ता खोबरेल तेलात काळा होईपर्यंत उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यावर आठवड्यातून दोनदा डोक्याला मालिश करा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहण्यास मदत होते.
आवळ्याचे फायदे
आवळा अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी ने भरपूर असतो. तुम्ही आवळा पावडर किंवा ताज्या आवळ्याचा रस खोबरेल तेल किंवा थोड्या पाण्यात मिसळून डोक्याला लावू शकता. हा उपाय अकाली पांढरे होणारे केस रोखतो.
ब्लॅक टी
तुम्ही कडक ब्लॅक टी तयार करून थंड करून घ्या. या पाण्याने केस धुतल्यास केसांना गडद काळा रंग आणि नैसर्गिक चमक मिळते. हा उपाय पांढऱ्या केसांची समस्या दूर करतो.
कांद्याचा रस
कांद्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतात. तुम्ही कांद्याच्या रसात थोडे खोबरेल तेल मिसळून घ्या. हे मिश्रण डोक्याला लावून चांगली मालिश करा आणि १५ मिनिटांनंतर केस धुवून टाका.
मेहंदी पावडर
तुम्ही कोमट पाण्यात मेहंदी पावडर मिसळून त्याची पेस्ट तयार करा. तुमचे केस कोरडे असतील तर या मिश्रणात थोडे दही नक्की मिसळा. हे मिश्रण केसांना चांगले लावून घ्या. हे लावताना हातात ग्लोव्हज घालणे फायदेशीर ठरते.
जास्वंदाचं तेल
जास्वंद हा केसांच्या वाढीसाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. तुम्ही जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या गरम पाण्यात उकळून घ्या. चांगल्या परिणामांसाठी यात कढीपत्ताही टाका. ही पेस्ट केसांना लावून १ तासानंतर केस धुवून टाका.

