Best Oil For Skin In Winter : हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू लागते. अशावेळी तुम्ही हिवाळ्यात चेहऱ्यावर या पाच तेलांचा वापर करू शकता.

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतुंपैकी हिवाळा आल्हाददायक असला तरी, या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कफ प्रकृतीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक ठरणारा असतो. हिवाळ्यातील वातावरण त्वचेवरही परिणाम करते. त्वचा कोरडी, शुष्क होते आणि त्यामुळे अंगाला खाज सुटू शकते. शिवाय, त्वचा निर्जीव आणि निस्तेजही दिसू लागते. त्यामुळे या काळात मॉइश्चरायझरचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या तेलांचा वापर करणेही फायदेशीर ठरते.

हिवाळ्यात त्वचा खूप लवकर कोरडी, खडबडीत आणि रूक्ष होते. अशावेळी योग्य तेलाचा वापर करणे महत्त्वाचे असते, कारण हिवाळ्यात मॉइश्चरायझरसुद्धा निष्प्रभ ठरतात आणि त्वचा कोरडी वाटू लागते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी थोड्याशा तेलाने त्वचेची मालिश केल्यास त्वचेत मऊपणा येतो. तसेच, खडबडीतपणाही कमी होतो. पण प्रश्न असा आहे की, हिवाळ्यात चेहऱ्यावर कोणते तेल लावावे? चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो...

हिवाळ्यात चेहऱ्यावर कोणते तेल लावावे

बदामाचे तेल

बदामाचे तेल व्हिटॅमिन ई च्या गुणांनी परिपूर्ण असते. हे शुष्क त्वचेला आतून पोषण देते, त्वचेला नरम, चमकदार आणि तजेलदार बनवते.

जोजोबा ऑइल

जोजोबा ऑइल खूप चिकट नसते, त्यामुळे ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे. विशेषतः, तेलकट त्वचा किंवा मुरुमे असलेल्या त्वचेचे लोकही याचा सहज वापर करू शकतात. हिवाळ्यात हे तुमच्या त्वचेला मुलायम बनवते, तसेच पिंपल्स कमी करण्यासही मदत करते.

आर्गन ऑइल

आर्गन ऑइल केवळ हिवाळ्यात त्वचेला मऊ आणि चमकदार बनवत नाही, तर ते अँटी-एजिंग गुणांनीही परिपूर्ण आहे. वयाच्या तिशीनंतर आर्गन ऑइलने चेहऱ्यावर मसाज केल्यास वृद्धत्वाची चिन्हे दिसत नाहीत. हे तेल खूप हलके असते, ज्यामुळे चमकदार लूक मिळतो.

जैतुणाचे तेल

जैतुणाचे तेल सहज उपलब्ध होते. याने मसाज केल्याने कोरडेपणा आणि खाजेपासून आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी जैतुणाच्या तेलाने मसाज करावी. तुम्ही हे तेल त्वचेवर आणि केसांवरही लावू शकता.

कॅस्टर ऑइल

कॅस्टर ऑइलमध्ये डीप मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळतात. विशेषतः, त्वचेवरील भेगा, कोरडे आणि फाटलेले भाग जसे की टाचा किंवा हात-पायांसाठी हे खूप फायदेशीर आहे. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर तुम्ही कॅस्टर ऑइलसोबत थोडे नारळाचे किंवा जैतुणाचे तेल मिसळू शकता.