Belly Fat Loss : सुटलेले पोट कमी करायचंय? केवळ या एका आसनाचा करा सराव

| Published : Dec 19 2023, 11:31 AM IST / Updated: Dec 19 2023, 11:57 AM IST

belly fat

सार

Belly Fat Loss : डाएट व नियमित व्यायाम करूनही पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होत नाहीय? तर आपल्या वर्कआऊट रुटीनमध्ये केवळ या एका आसनाचा करा समावेश.

Belly Fat Loss Tips News : आहारामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचा अभाव आणि दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयींमुळे आरोग्याचे मोठे नुकसान होते. यापैकीच उद्भवणारी एक गंभीर समस्या म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणाच्या (Weight Loss Tips) समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक डाएटपासून ते जिमपर्यंत अशा कित्येक गोष्टींचा आधार घेतात. 

पण इतके कष्ट घेऊनही शरीरातील अतिरिक्त चरबी काही केल्या कमी होत नाही. आपणही बेली फॅट्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय शोधताय का? तर आपल्या वर्कआऊट रुटीनमध्ये केवळ हलासनाचा (Halasana Practice) नियमित सराव करा. कसा करावा सराव? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

हलासनाचा कसा करावा सराव? (How To Practice Halasana)

 • हलासनाचा सराव करण्यासाठी सर्वप्रथम योग मॅटवर आपल्या पाठीवर झोपा.
 • श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू ठेवत आपले दोन्ही पाय हळूहळू वर उचला.
 • सुरुवीतास दोन्ही पाय 30 अंश डिग्री व यानंतर 90 अंश डिग्रीपर्यंत उचला. यानंतर हळूहळू आपले दोन्ही पाय डोक्याच्या मागील बाजूस नेऊन जमिनीवर ठेवा.
 • पाय गुडघ्यामध्ये दुमडले जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
 • आपले दोन्ही हात जमिनीवरच ठेवा.
 • ही झाली हलासनाची अंतिम स्थिती.
 • आपल्या क्षमतेनुसार आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये राहावे.

हलासनाचा सराव करण्याचे फायदे (Halasana Benefits)

 • शरीराचे अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत मिळते. विशेषतः पोटावरील चरबी कमी होते.
 • चेहऱ्यावर तेज येण्यास मदत मिळू शकते. कारण शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया व ऑक्सिजन वायूचा प्रवाह देखील सुधारतो.
 • शरीराचे पोश्चर सुधारते.
 • पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि शरीराची चयापचयाची क्षमताही वाढते.
 • शारीरिक व मानसिक ताण-तणाव देखील कमी होतो.
 • पोटाशी संबंधित समस्या उदाहरणार्थ बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्याही कमी होण्यास मदत मिळू शकते.
View post on Instagram
 

हलासनाचा सराव कोणी करणे टाळावे?

तीव्र स्वरुपात पाठदुखी, पोटदुखी, मानदुखी, गुडघेदुखी होत असल्यास या आसनाचा सराव करणं टाळावे.

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

Weight Loss : या मॉडेलचं 234kg होते वजन, जाणून घ्या 'फॅट टू फिट' जर्नी

Health Tips : सावधान! तुम्ही चुकीच्या वेळी पपई खाताय का?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करतात या छोट्याशा बिया? रीसर्चमधील मोठी माहिती