Weight Loss : या मॉडेलचं एकेकाळी 234kg होते वजन, जाणून घ्या तिची ‘फॅट टू फिट’ जर्नी
फोटोमध्ये दिसणाऱ्या या तरुणीचे वजन तब्बल 234kg इतके होते. लठ्ठपणाच्या समस्येमुळे खूप लाज वाटत असल्याचे तिने सांगितले.
लठ्ठपणामुळे तिच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचे निधन झाले. यानंतर या तरुणीने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.
मेलबर्नमधील रहिवासी असणारी 34 वर्षीय जेसिका फेरोची ही कहाणी आहे. जेसिकाने लठ्ठपणावर मात करत मॉडेल व बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात स्वतःचे नाम कमावले आहे.
लठ्ठपणामुळे जेसिका उच्च रक्तदाब, श्वासोच्छवास प्रक्रियेतील अडथळे, पाठदुखी, सांधेदुखी या समस्यांमुळे त्रस्त होती. वडिलांच्या निधनानंतर तिने वजन घटवण्याचा निर्णय घेतला.
जेसिकाने सांगितले की दिवसभरात ती खाद्यपदार्थांच्या माध्यमातून 6 हजार 500 हून अधिक प्रमाणात कॅलरीचे सेवन करायची. दिवसाला दोन मोठे पिझ्झा सुद्धा खात असे.
नैराश्याचा सामना करणाऱ्या जेसिकाने 12 जुलै 2018रोजी गॅस्ट्रिक सर्जरी केली. यानंतर शरीराचे वजन घटण्यास मदत मिळू लागली.
जेसिकाने आता आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण मिळवले आहे. तिच्या डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचाच समावेश असतो.
जेसिकाने पौष्टिक आहाराचे सेवन करून तब्बल 158Kg वजन घटवले. आता तिच्या शरीराचे वजन 76Kg एवढे आहे.
लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी जेसिकाची कहाणी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते.