वास्तुनुसार, बाथरुममध्ये ठेवण्यात आलेल्या काही गोष्टींमुळे तुम्हाला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे आजच अशा वस्तू काढून टाका.
बाथरुममध्ये चुकूनही फुटलेला आरसा ठेवू नये. यामुळे नकारात्मक उर्जा वाढण्यासग घरात वास्तुदोष निर्माण होतो.
नळातून वाहणारे पाणी घरात नकारात्मक उर्जा आणते. यामुळे बाथरुममधील नळ वेळीच दुरुस्त करून घ्या.
बाथरुममध्ये कधीच रिकामी बादली ठेवू नये. यामुळे घरात दुर्भाग्य निर्माण होण्याची शक्यता वाढली जाते.
बाथरुममध्ये ओलसर कपडे ठेवू नये. यामुळे सुर्य दोष लागतो.
तुटलेली चप्पल बाथरुममध्ये ठेवू नये असे वास्तुशास्रात सांगितले आहे. यामुळे नकारात्मक उर्जा वाढल्या जातात.
बाथरुमध्ये रोपं कधीच ठेवू नयेत. यामुळे घरातील वास्तुदोष वाढला जातो.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.