सार

केस गळतीच्या समस्येचा सामना करत आहात का? कितीही उपाय करुनही केस गळती थांबत नाही? यावर उपाय म्हणजे आवळा आहे. याचा डाएटमध्ये समावेश केल्यास केसांच्या समस्येवर नक्कीच कामी येऊ शकतो.

Amla Benefits for Hair : हेल्दी डाएट आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचे आहे. डाएट हेल्दी राहण्यासह त्वचेला चमक आणते, केसांचे आरोग्य राखते. पण खाण्यापिण्यात तुम्ही अनहेल्दी फूड्सचे सेवन करत असाल तर आजारी पडू शकता. याशिवाय त्वचाही काळवंडलेली दिसते, केस गळतीची समस्या उद्भवू शकते.

खरंतर, केस गळतीमागील महत्वाचे कारण म्हणजे महत्वाच्या पोषण तत्त्वांची कमतरता शरिरात निर्माण होणे. बहुतांश महिलांना खूप प्रयत्न करुनही केसांच्या समस्येपासून पूर्णपणे सुटका मिळत नाही. अशातच डाएटमध्ये आवळ्याचा समावेश करू शकता. आवळ्यामध्ये केसांसंबंधित प्रत्येक समस्येचा उपाय आहे. केसांची वाढ होणे ते केस गळतीची समस्या आवळ्यामुळे कमी होऊ शकते. जाणून घेऊया आवळ्याचा डाएटमध्ये कसा समावेश करु शकता याबद्दल सविस्तर...

आवळ्याचा असा करा डाएटमध्ये समावेश

  • आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरिरातील लोहाचे अवशोषण करण्यास मदत होते आणि हिमग्लोबीनचा स्तर वाढला जातो. अशातच शरिरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. भूक वाढली जाते, डोळ्यांचे आरोग्य सुधारले जाते आणि केसांची वाढ होते.
  • केसांसाठी आवळा एखाद्या टॉनिक प्रमाणे काम करते. केस पांढरे होणे, केस गळती अथवा कोंड्याच्या समस्येवरही आवळा फायदेशीर ठरतो.
  • आवळ्याचा काही प्रकारे डाएटमध्ये समावेश करू शकता. आवळ्याची पावडर, ज्यूस पिऊ शकता.
  • केसांच्या समस्येवर आवळ्याचे तेलही लावू शकता. यामुळे केसांची मूळ मजबूत होतात.
  • आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केस पांढरे होणे किंवा केस गळतीची समस्या थांबू शकते.
  • आवळ्याचा ज्यूस सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने केसांना चमक येते.
  • आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध मिक्स करुन प्यायल्यानेही आरोग्याला फायदा होतो.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

किडनी स्टोनचा भयंकर त्रास होईल दूर, 5 हेल्दी ड्रिंक्स करतील चमत्कार

सतत जंक फूड खाण्याची आवड आहे? होईल हा गंभीर आजार, वेळीच व्हा सावध