MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Washing Machine Hack : वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा गोळा? हा व्हायरल हॅक वापरण्याआधी हे वाचाच

Washing Machine Hack : वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा गोळा? हा व्हायरल हॅक वापरण्याआधी हे वाचाच

सोशल मीडियावर एक नवीन जुगाड व्हायरल होतोय. वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा गोळा टाकल्यास कपडे मऊ होतात आणि वीज बिलही कमी येतं, असा दावा केला जातोय. पण या हॅकमध्ये खरंच तथ्य आहे का?

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 10 2026, 06:39 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
या व्हायरल हॅकमागचं विज्ञान काय?
Image Credit : Dimo Petkov YT

या व्हायरल हॅकमागचं विज्ञान काय?

स्वयंपाकघरात जेवण गरम ठेवण्यासाठी किंवा पॅक करण्यासाठी वापरली जाणारी 'ॲल्युमिनियम फॉइल' (Aluminium Foil) आता वॉशिंग मशीनमध्ये पोहोचली आहे! टिकटॉक, इन्स्टाग्रामवर एक नवीन लाँड्री हॅक जबरदस्त व्हायरल होत आहे. यानुसार, कपडे धुताना वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये ॲल्युमिनियम फॉइलचे छोटे गोळे (Balls) टाकल्यास कपडे मऊ होतात, वीज बिल कमी येते आणि कपडे एकमेकांना चिकटत नाहीत, असा दावा केला जातोय. पण ही ट्रिक खरंच काम करते का? यामागे नेमकं काय विज्ञान आहे?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
फॉइलचा गोळा नेमकं काय काम करतो?
Image Credit : Getty

फॉइलचा गोळा नेमकं काय काम करतो?

पॉलिस्टर, नायलॉनसारखे सिंथेटिक कपडे एकत्र धुतल्यावर त्यांच्यात घर्षणामुळे स्थिर वीज (Static Electricity) तयार होते. यामुळे कपडे एकमेकांना चिकटतात, केसांसारखे धागे (Lint) खेचून घेतात आणि घडी घालताना 'चटपट' असा आवाज येतो. ॲल्युमिनियम विजेचा उत्तम वाहक (Good conductor of electricity) आहे. त्यामुळे, फॉइलचा गोळा मशीनमध्ये फिरताना ही स्थिर वीज शोषून घेतो (Discharge करतो) आणि कपड्यांना एकमेकांना चिकटण्यापासून रोखतो, असा या हॅकमागचा तर्क आहे.

Related Articles

Related image1
Ink Stain Removal : पावडर नको, भिजवणं नको; घरातल्या एका गोष्टीने शाईचा डाग मिनिटांत गायब
Related image2
Vastu Tips : मेहनत करूनही पैसा टिकत नाही? फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळा 'या' 3 गोष्टी
35
हा हॅक वापरायचा कसा?
Image Credit : Getty

हा हॅक वापरायचा कसा?

हा हॅक कसा वापरायचा याची पद्धत अशी सांगितली जाते - स्वयंपाकात वापरली जाणारी सामान्य ॲल्युमिनियम फॉइल घेऊन त्याचा टेनिस बॉलच्या आकाराचा (5 ते 7 सेमी) घट्ट गोळा बनवा. या गोळ्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असावा, त्याला टोकदार कडा नसाव्यात. कपडे टाकण्यापूर्वी रिकाम्या ड्रममध्ये 1 ते 3 गोळे टाका. त्यानंतर कपडे आणि डिटर्जंट टाकून मशीन सुरू करा. हे गोळे खराब होईपर्यंत (काही आठवड्यांपर्यंत) पुन्हा वापरता येतात, असं म्हटलं जातं. जीन्स, टॉवेल आणि जाड कपडे धुण्यासाठी याचा जास्त वापर केला जातो.

45
तज्ज्ञ काय म्हणतात? (सावधान!)
Image Credit : Getty

तज्ज्ञ काय म्हणतात? (सावधान!)

हा हॅक कपड्यांमधील स्थिर वीज काही प्रमाणात कमी करू शकतो, पण यामुळे कपडे स्वच्छ किंवा मऊ होत नाहीत, असं गृहपयोगी वस्तूंचे तज्ज्ञ स्पष्ट करतात. उलट, यात काही धोकेही आहेत.

कपडे फाटण्याचा धोका - फॉइलचा गोळा व्यवस्थित घट्ट नसेल, तर त्याच्या टोकदार कडा रेशीम (silk), नायलॉनसारखे नाजूक कपडे फाडू शकतात.

मशीन खराब होण्याचा धोका - सततच्या वापरामुळे ॲल्युमिनियमचे तुकडे पडून ते मशीनच्या फिल्टरमध्ये अडकू शकतात किंवा ड्रमला ओरखडे येऊ शकतात.

वॉरंटी रद्द होऊ शकते - वॉशिंग मशीनमध्ये अशा अनावश्यक वस्तू टाकून मशीन खराब झाल्यास, कंपन्या वॉरंटी (Warranty) देत नाहीत.

55
मग योग्य पर्याय कोणता?
Image Credit : Getty

मग योग्य पर्याय कोणता?

अंतिम सल्ला - कपडे एकमेकांना चिकटू नयेत आणि मऊ राहावेत असं वाटत असेल, तर बाजारात मिळणारे सुरक्षित फॅब्रिक कंडिशनर किंवा 'वूल ड्रायर बॉल्स' (Wool Dryer Balls) वापरणे हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक हॅकवर आंधळेपणाने विश्वास ठेवून महागडी वॉशिंग मशीन खराब करून घेऊ नका, असा इशारा तज्ज्ञ देतात.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Makhana Benefits : मखाणे खाण्याचे ७ जबरदस्त फायदे, डाएटमध्ये लगेच करा सामील
Recommended image2
Soft Chapati : चपाती मऊ लुसलुशीत बनवण्यासाठी 8 सोप्या टिप्स, पीठ मळताना फक्त 'हे' वापरा
Recommended image3
Saree Designs : कुणालाही आवडतील अशा साड्या, पाहा हे जबरदस्त डिझाइन्स
Recommended image4
Toe Rings : जुन्या डिझाइनला करा बाय-बाय! पाहा जोडव्यांचे लेटेस्ट आणि ट्रेंडी प्रकार
Recommended image5
Boiled Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात? जाणून घ्या ६ महत्त्वाच्या टिप्स
Related Stories
Recommended image1
Ink Stain Removal : पावडर नको, भिजवणं नको; घरातल्या एका गोष्टीने शाईचा डाग मिनिटांत गायब
Recommended image2
Vastu Tips : मेहनत करूनही पैसा टिकत नाही? फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळा 'या' 3 गोष्टी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved