MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Vastu Tips : मेहनत करूनही पैसा टिकत नाही? फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळा 'या' 3 गोष्टी

Vastu Tips : मेहनत करूनही पैसा टिकत नाही? फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळा 'या' 3 गोष्टी

तुमच्या हातात पैसा टिकत नाहीये का? मग फरशी पुसण्याच्या पाण्यात या ३ गोष्टी मिसळून पाहा! सध्या इन्स्टाग्रामवर २.६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवून प्रचंड व्हायरल झालेल्या या सोप्या उपायाबद्दलची माहिती इथे दिली आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 10 2026, 02:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
नेटिझन्सचं लक्ष वेधणारा व्हिडीओ
Image Credit : AI Image

नेटिझन्सचं लक्ष वेधणारा व्हिडीओ

सोशल मीडियावर रोज अनेक सल्ले, घरगुती उपाय आणि वास्तू टिप्स शेअर होत असतात. सध्या इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला तब्बल २.६ मिलियन म्हणजेच २६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. घरात शांतता आणि आर्थिक भरभराट होण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात काही खास गोष्टी मिसळण्याचा सल्ला या व्हिडीओत दिला आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
फरशी पुसण्याच्या पाण्यात या गोष्टी मिसळा
Image Credit : Pixabay

फरशी पुसण्याच्या पाण्यात या गोष्टी मिसळा

व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरच्या मते, फरशी पुसण्याच्या पाण्यात खडे मीठ, हिरवा कापूर आणि हळद मिसळावी. हिरवा कापूर घरात चांगला सुगंध पसरवतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, असं म्हटलं जातं. यासोबत तुम्ही रोज वापरत असलेले फ्लोअर क्लिनर लिक्विडही वापरू शकता. विशेषतः मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी हा उपाय केल्यास घरात चांगले बदल दिसू शकतात, असंही या युजरने सांगितलं आहे.

Related Articles

Related image1
Numerology Numbers : हे 3 अंक म्हणजे जणू 'पैशाचं चुंबक', अचानक होतो प्रचंड धनलाभ
34
कोणत्या समस्यांवर मिळतो उपाय?
Image Credit : X

कोणत्या समस्यांवर मिळतो उपाय?

घरात सतत चिडचिड होत असेल, कोणाची दृष्ट लागली असेल आणि कष्ट करूनही पैसा टिकत नसेल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल, तर हा उपाय करून पाहता येईल, असं व्हिडीओत म्हटलं आहे. मीठ आणि हळद नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) शोषून घेतात आणि सकारात्मकता वाढवतात, असा अनेकांचा विश्वास आहे.
44
केवळ उपायच नाही, तर मेहनतही महत्त्वाची
Image Credit : AI Image

केवळ उपायच नाही, तर मेहनतही महत्त्वाची

हा उपाय केल्यावर एका दिवसात चमत्कार होणार नाही, हेदेखील व्हिडीओमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 'या उपायासोबतच आपले सततचे प्रयत्न आणि कष्टही महत्त्वाचे आहेत. श्रद्धा आणि मेहनत यांची जोड असली की आयुष्यात नक्कीच प्रगती होते,' असंही व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने म्हटलं आहे. त्यामुळे तुम्हीही हा सोपा उपाय एकदा घरी करून पाहू शकता.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Lucky Bamboo : घरातली रोजची भांडणं थांबतील, नशीब चमकेल; फक्त 'हे' एक रोप लावा!
Recommended image2
Rangoli Designs : गणपतीसाठी सोप्या रांगोळी डिझाइन्स, या 5 आयडिया वापरून घर सजवा
Recommended image3
Ink Stain Removal : पावडर नको, भिजवणं नको; घरातल्या एका गोष्टीने शाईचा डाग मिनिटांत गायब
Recommended image4
Ganesh Decoration 2026 : बाप्पाच्या सजावटीसाठी 10 भन्नाट आयडिया, घरच्या घरी करा इको-फ्रेंडली डेकोरेशन
Recommended image5
Empty Stomach Workout : रिकाम्या पोटी व्यायाम करताय? 90 टक्के लोक ही चूक करतात, जाणून घ्या धोके
Related Stories
Recommended image1
Numerology Numbers : हे 3 अंक म्हणजे जणू 'पैशाचं चुंबक', अचानक होतो प्रचंड धनलाभ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved