Rare Sensorineural Nerve Hearing Loss आजार नक्की काय आहे? जाणून घ्या लक्षणांसह बचाव करण्याचे उपाय

| Published : Jun 18 2024, 03:19 PM IST / Updated: Jun 18 2024, 03:35 PM IST

 Rare Hearing Disorder

सार

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अल्का याग्निक यांना दोन्ही कानांनी ऐकू येणे बंद झाले आहे. खरंतर, गायिका रेअर सेन्सोन्युरल नर्व हिअरिंग लॉस आजार झाला आहे. याच आजाराबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Alka Yagnik Diagnosed With Rare Hearing Disorder : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांनी गायलेली अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. पण सध्या गायिका खासगी आयुष्यात एका गंभीर आजाराचा सामना करत आहेत. अलका याग्निक यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यांना रेअर सेन्सॉरी हिअरिंग लॉस आजार झाल्याचे म्हटले आहे. यामुळे गायिकेला दोन्ही कानांनी ऐकू येणे बंद झाले आहे. जाणून घेऊया अलका याग्निक यांना झालेल्या रेअर सेन्सॉरी हिअरिंग लॉस आजाराबद्दल सविस्तर...

रेअर सेन्सोन्युरल नर्व हिअरिंग लॉस नक्की काय आहे?
रेअर सेन्सोन्युरल नर्व हिअरिंग लॉस (Rare Sensorineural Nerve Hearing Loss) असा आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला ऐकू येण्यास समस्या होते. याशिवाय एका काळानंतर व्यक्ती काहीही ऐकून शकत नाही. खरंतर, कानाच्या आतमधील सेल्स म्हणजेच क्लोक्लीअमध्ये असणारे सेल्सला नुकसान पोहोचल्याने ऐकू येणे बंद होते. या व्यतिरिक्त कान ते मेंदूपर्यंत ज्या नर्व्सच्या माध्यमातून आवाज पोहोचतो त्याचे पूर्णपणे नुकसान होते. यामुळे रेयर सेंसरी नर्व हिअरिंग लॉसची समस्या होऊ शकते.

वाढत्या वयासह रेयर सेंसरी नर्व हिअरिंग लॉस समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली जाते. एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाल्यास त्यालाही रेयर सेंसरी नर्व हिअरिंग लॉसचा सामना करावा लागू शकतो. या आजाराच्या सुरुवातीला हे कळू शकते की, रुग्णाला कितपत ऐकू येत आहे.

आजाराची लक्षणे

  • संवाद साधताना ऐकणे किंवा समजून घेण्यास समस्या उद्भवणे
  • एका कानापेक्षा दुसऱ्या कानाला अधिक उत्तम ऐकू येणे
  • कानातून विचित्र आवाज येणे

कसे दूर रहाल?

  • जोरजोरात आवाज येणाऱ्या ठिकाणाहून दूर रहा
  • गाणी किंवा व्हिडीओ पाहताना आवाज कमी ठेवा
  • आपली ऐकण्याची क्षमता किती आहे याची वेळोवेळी चाचणी करून घ्या
  • कानासंदर्भात एखादी समस्या असल्यास डॉक्टरांची भेट घ्या

आणखी वाचा : 

पहिल्यांदा Yoga करणार असल्यास या 5 गोष्टी ठेवा लक्षात

जेवणात अत्याधिक प्रमाणात मीठाचे सेवन करता? होईल गंभीर समस्या