MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात येईल सुख-समृद्धी

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात येईल सुख-समृद्धी

अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात फार महत्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचींची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, यंदा अक्षय्य तृतीयेचा सण 30 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी नक्कीच येईल.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 18 2025, 12:26 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
अक्षय्य तृतीयेचा सण
Image Credit : Freepik

अक्षय्य तृतीयेचा सण

वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी कोणतेही शुभ कार्य केल्याने त्याचे फळं मिळते. या दिवशी बहुतांशजण सोनं-चांदीची ज्वेलरी खरेदी करतात. याशिवाय अक्षय्य तृतीयेला नव्या कामांचा शुभारंभ जसे की, विवाह, मुंडन, लग्नसोहळा करणे शुभ मानले जाते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
यंदा अक्षय्य तृतीया कधी?
Image Credit : Getty

यंदा अक्षय्य तृतीया कधी?

यंदा अक्षय्य तृतीयेचा सण 30 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. या दिवशी विशेष पूजाही केली जाते. कारण धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले दान कधीच निष्फळ होत नाही. उलट पुण्य लाभते. देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. जाणून घेऊया अक्षय्य तृतीयेच्या सणावेळी कोणते खास उपाय करू शकता हे जाणून घेऊया.

Related Articles

Related image1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी १० विचार, आजही तुमच्या जीवनाला देतील नवी दिशा!
Related image2
अक्षय्य तृतीयेला सोनं का खरेदी करतात?
37
लक्ष्मी चरण पादुका
Image Credit : Facebook

लक्ष्मी चरण पादुका

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी केली जाते. खासकरुन सोनं-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. अशी मान्यता आहे की, या तिथीवेळी सोने-चांदी खरेदी केल्याने लाभ होते. याशिवाय तुम्ही खरेदी केलेल्या गोष्टी अक्षय्य होतात. अशातच अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीच्या पादुका खरेदी करू शकता. यामुळे घरात भरभराट होईल.

47
12 दानाचे महत्व
Image Credit : Social Media

12 दानाचे महत्व

अक्षय्य तृतीयेला खरेदी करण्यासह दानधर्मही करू शकता. या दिवशी 12 प्रकारच्या दानाचे महत्व आहे. यावेळी गौ, भूमी, तीळ, तूप, वस्र, धान्य, गूळ, चांदी, मीठ, मध, सोन आणि कन्यादान करू शकता. या सर्वांमध्ये कन्यादान सर्वाधिक महत्वाचे आहे.

57
आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी
Image Credit : Facebook

आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी

अक्षय्य तृतीयेचा श्रीहरी आणि देवी लक्ष्मीची एकत्रित पूजा करा. यामुळे वैवाहिक आयुष्य आनंदी होते. याशिवाय गणपतीची पूजाही करू शकता.

67
शंख खरेदी करा
Image Credit : Facebook

शंख खरेदी करा

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीसंबंधित काही गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी शंख खरेदी करू शकता. संध्याकाळी देवी लक्ष्मी, कुबेर आणि शंखाची पूजा करा. यानंतर शंख लाल कापडात बांधून तिजोरीमध्ये ठेवा. हा उपाय केल्यने घरात देवी लक्ष्मीचा वास राहिल. आयुष्यात सुख-समृद्धी येईल.

77
आर्थिक लाभासाठी
Image Credit : Social Media

आर्थिक लाभासाठी

आर्थिक चणचणींचा सामना करत असाल तर अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी केशर आणि हळदीने देवी लक्ष्मीची पूजा करा. यामुळे पैशांची अडचण दूर होईल.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Hair Tips: पातळ केसातही दिसा स्टायलिश, त्रिशा कृष्णनकडून घ्या 6 टिप्स
Recommended image2
Fashion Tips: वटसावित्रीला ट्राय करा हे खास ब्रायडल दुपट्टे, दिसा हटके
Recommended image3
Homemade Amchur Powder : बाजारातली भेसळयुक्त पावडर कशाला? घरीच बनवा अस्सल आमचूर पावडर
Recommended image4
Wall Planter: रिकामी भिंत बनेल 'ग्रीन कॉर्नर', फक्त ५०० रुपयांपासून सुरू होतात हे स्टायलिश प्लांटर्स
Recommended image5
Curd Recipes : उन्हाळ्यात १५ मिनिटांत बनवा दह्याचे हे ४ झटपट पदार्थ, शरीराला मिळेल थंडावा
Related Stories
Recommended image1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी १० विचार, आजही तुमच्या जीवनाला देतील नवी दिशा!
Recommended image2
अक्षय्य तृतीयेला सोनं का खरेदी करतात?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved