सार

Flower Rangoli for Diwali 2024 : यंदा दिवाळी 1 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी अभ्यंगस्नान ते दाराला तोरण लावण्यासह सुंदर रांगोळी काढली जाते. अशातच यंदाच्या दिवाळीला फुलांच्या पुढील काही खास रांगोळी काढू शकता.

Flower Rangoli for Diwali 2024 : यंदा दिवाळीचा सण येत्या 1 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या तिथीला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, या दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवून अयोध्येत आले होते. याचा आनंद साजरा करण्यासाठी दिवे लावण्यात आले होते. दिवाळीच्या दिवशी घरोघरी पणती, दिवे लावण्यासह दारापुढे सुंदर अशी रांगोळी काढतात. पाहूया यंदाच्या दिवाळीवेळी फुलांपासून काढलेल्या रांगोळीच्या काही खास डिझाइन...

रंगीत फुलांची रांगोळी 
कोणत्याही शुभ कामांवेळी स्वस्तिक काढून सुरुवात केली जाते. दिवाळीवेळी रंगीत फुलांचा वापर करुन अशी सुंदर रांगोळी दारापुढे काढू शकता. 

चौकोनाकृती रांगोळी 
फुलांनी चौकोन तयार करुन त्यामध्ये स्वस्तिक काढून घ्या. याशिवाय चौकोनाच्या चारही बाजूंना फुलांनीच वेगळी डिझाइन काढून रांगोळी अधिक सजवा. यावेळी मेणबत्तीचे दिवेही रांगोळीच्या बाजूने लावू शकता. 

प्रवेशद्वाराबाहेर काढण्यासाठी मनमोहक रांगोळी
घराच्या प्रवेशद्वाराबाहेर मोकळी जागा असल्यास तेथे अशी फुलांची रांगोळी काढू शकता. एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये फुल घालून सजवा. यामध्ये पाण्यावरील दिवेही लावू शकता. 

गोड्यांच्या फुलांची रांगोळी
गोंड्याची फुलं, गुलाबाच्या पाकळ्या वापरुन सुंदर अशी फुलांची रांगोळी यंदाच्या दिवाळीवेळी काढू शकता. 

आकर्षक फुलांची रांगोळी
दारापुढे फुलांची आकर्षक अशी फुलांची रांगोळी काढू शकता. यावेळी गोलाकार, आयताकृती अशा वेगवेगळ्या पॅटर्नमधील फुलांची रांगोळी सुंदर दिसते.

दिव्यांची आरास केलेली रांगोळी 
दिव्यांची आरास करण्यात आलेली फुलांची रांगोळी यंदाच्या दिवाळीला दारापुढे नक्की काढू शकता. 

गोलाकार फुलांची रांगोळी 
गोंड्याची आणि अन्य वेगळी फुल वापरुन गोलाकार फुलांची रांगोळी काढू शकता. रांगोळीच्या बाजूने आंब्यांची पानेही लावा. यामुळे रांगोळी अधिक सुंदर दिसेल.

फुलांच्या स्वस्तिकची रांगोळी
फुलं वापरुन स्वस्तिकची रांगोळी काढू शकता. गोंड्यांच्या पाकळ्या वापरुन आकर्षक अशी रांगोळी काढू शकता. 

आणखी वाचा : 

दिवाळीसाठी उंबरठ्याबाहेर काढा या 8 मनमोहक Border Rangoli, पाहा डिझाइन

Chakali Recipe : दिवाळीसाठी तयार करा खुसखुशीत भाजणीच्या चकल्या, पाहा रेसिपी