सार
Summer Skin Care : कडाक्याच्या उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी बहुतांशजण सनस्क्रिनचा वापर करतता. पण त्वचेसाठी कोणत्या प्रकारचे सनस्क्रिन योग्य असते हे तुम्हाला माहितेय का?
Sunscreen Buying Tips : उन्हाळ्याच्या दिवसात सनस्क्रिनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होण्यास मदत होते. पण बहुतांशजमांना अशी समस्या असते की, सनस्क्रिन लावल्यानंतरही त्वचा काळवंडली जाते अथवा त्वचेचे नुकसान होते. अशातच त्वचेसाठी कोणते सनस्क्रिन योग्य आहे हे कसे शोधायचे याबद्दलही गोंधळ उडतो. खरंतर, तुम्ही सनस्क्रिन लोशन खरेदी करताना तुमची लाइफस्टाइल, बजेट आणि स्किन टाइपनुसार निवडावे.
सनस्क्रिन लोशन खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी
- सनस्क्रिन लोशन खरेदी करताना त्यावर युवी ए आणि युवी बी प्रोटेक्शनसंदर्भात माहिती दिलीय की नाही हे तपासून पाहा. कमीत कमी 30-50 एसपीएफ असणारे सनस्क्रिन लोशन खरेदी करावे.
- तुम्हाला अत्याधिक घाम येत असल्यास अथवा स्विमिंग करण्याआधी सनस्क्रिन लावायचे असल्यास ते वॉटरप्रुफ असावे.
- त्वचा संवेदनशील असल्यास असा ब्रँड खरेदी करू नका ज्यामध्ये पॅरा-अॅमिनो बेंजोइक (पीएबीए) नसेल.
- सनस्क्रिन तुमच्या त्वचेवर सूट होत नसल्यास त्याचा वापर करणे बंद करा.
- त्वचा तेलकट असल्यास आणि पिंपल्सची समस्या अल्यास ऑइल बेस्ड एवजी वॉटर बेस्ड प्रोडक्ट्सचा वापर करा.
- महागडे सनस्क्रिन त्वचेसाठी योग्य असतात असे नव्हे. यामुळे प्रोडक्टवर दिलेली माहिती व्यवस्थितीत वाचावी.
- सनस्क्रिन लोशन खरेदी करताना त्यावरील एक्सपायरी डेट नक्की तपासून पाहा.
सनस्क्रिन लोशन लावण्याचे फायदे
- सनस्क्रिन लावल्याने सनबर्न पासून दूर राहता.
- टॅनिंगची समस्या होत नाही.
- त्वचा हेल्दी राहते.
- स्किन कॅन्सरपासून दूर राहता.
- हायपरपिगमेंटेशनपासून सुटका मिळते.
- एक्ने मार्क्स कमी होण्यास मदत होते.
सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत
सनस्क्रिनचा योग्य फायदा होण्यासाठी घराबाहेर पडण्याआधी कमीत कमी 10 मिनिटे लावा. याशिवाय प्रत्येक दोन तासांनीही पुन्हा सनस्क्रिन लावा. सनस्क्रिन लावण्याआधी त्वचेला मॉइश्चराइजर लावण्यास विसरू नका. जर तुम्ही मेकअप करणार असल्यास त्यावेळीही सनस्क्रिन लोशन लावू शकता. डोळ्याखाली सनस्क्रिन लावून घराबाहेर पडा.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
परफ्यूम लावल्यानंतरही शरिरातून निघणाऱ्या घामामुळे दुर्गंधी येते? नक्की फॉलो करा या टिप्स
अत्याधिक प्रमाणात आंबे खाता का? आरोग्यासंबंधित उद्भवतील या 5 समस्या