तोंड उघडून करुन झोपता का? ठरू शकते जीवघेणी समस्या

| Published : May 24 2024, 06:30 AM IST

Sleeping With Mouth Open

सार

एलर्जी किंवा सर्दीच्या कारणास्तव नाक बंद झाल्याने व्यवस्थितीत श्वास घेता येत नाही. अशातच तोंड उघडे ठेवून बहुतांशजण झोपतात. पण तोंड उघडे ठेवून झोपण्याच्या समस्येमुळे श्वास घेणे ते उच्च रक्तदाबासह हृदययासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

Health Care Tips : तुम्हाला सर्दी किंवा खोकला झाल्यास आणि श्वास घेण्यास समस्या येत असल्यास काहीजण तोंड उघडे ठेवून झोपतात. ही एक सामान्य बाब आहे. पण दीर्घकाल तोंड उघडून झोपण्याची समस्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हेल्थ एक्सपर्ट्स असे सांगतात की, भले श्वार घेण्यासाठी आपण नाकातोंडाचा वापर करतो. यामुळे शरिराला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. याशिवाय कार्बन डायऑक्साइडही सोडले जाते. पण तोंडावाटे सातत्याने श्वास घेतल्यास रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयासंबंधित समस्या उद्भवू शकतात. अभ्यासातून कळते की, तोंडाच्या वाटे श्वास घेण्यास फुफ्फुसाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यास अडथळा निर्माण होतो.

माउथ ब्रिटिंग म्हणजे काय?
अ‍ॅलर्जी किंवा सर्दीच्या कारणास्तव नाक बंद झाल्यास नाकाच्या माध्यमातून श्वास घेण्यास समस्या येते. याव्यतिरिक्त कठीण व्यायामाचा प्रकार करताना तोंडाच्या वाटेने श्वास घेतल्यास स्नायूंना वेगाने ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते. दरम्यान, झोपताना तोंड उघडे ठेवून झोपल्यास आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. नाकावाटे नव्हे तोंडातून श्वास घेत असाल तर काही लक्षणे दिसतात.

  • घोरणे
  • तोंड सुकणे
  • तोंडातून दुर्गंधी येणे
  • आवाज कर्कश होणे
  • झोपेतून उठल्यानंतर थकल्यासारखे वाटणे
  • नेहमीच थकवा जाणवणे
  • ब्रेन फ्रॉग
  • डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे

तोंडातून श्वास घेण्याच्या समस्येचे कारण
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, बहुतांश प्रकरणात तोंडाच्या वाटेने श्वास अशावेळी घेतला जातो तेव्हा नाकेच्या माध्यमातून हवेचा सुरळीत प्रवेश होऊ शकत नाही. यामागे काही कारणे असू शकतात. यामध्ये वाढलेले टॉन्सिल्स, तणाव आणि चिंता. याशिवाय ही स्थिती बॅक्टेरिया वेगाने वाढल्याच्या कारणास्तवही उद्भवू शकते.

आणखी वाचा : 

दररोज अंडी खाल्ल्यास आरोग्यावर होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर

अत्याधिक प्रमाणात आंबे खाता का? आरोग्यासंबंधित उद्भवतील या 5 समस्या