Potassium Rich Foods : मजबूत स्नायूंसाठी आहारात घ्या हे 7 पोटॅशियमयुक्त पदार्थ
तुम्ही रोज व्यायाम करत असाल, तर तुमच्या आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश नक्की करा. स्नायूंच्या बळकटीसाठी हे पदार्थ खूप महत्त्वाचे आहेत.

स्नायूंना बळकटी देणारे ७ पदार्थ
तुम्ही रोज व्यायाम करत असाल, तर आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थ नक्की घ्या. वजन उचलणे, धावणे किंवा सायकलिंग करताना आपले स्नायू सतत आकुंचन पावतात. पोटॅशियम पेशींमधील द्रवपदार्थांचे संतुलन राखते आणि मज्जातंतूंचे कार्य सुरळीत ठेवते. शरीरात पोटॅशियम कमी झाल्यास स्नायूंमध्ये अशक्तपणा, पेटके (cramps) आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.

केळी
केळी हा पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्रोत आहे. यातील कार्बोहायड्रेट्स शरीराची ऊर्जा पातळी वाढवतात. तर पोटॅशियम स्नायू आणि मज्जातंतूंचे कार्य सुरळीत ठेवते. व्यायामापूर्वी केळी खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.
बटाटे
बटाट्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते. विशेषतः सालीसकट बटाटा खाणे जास्त फायदेशीर ठरते. यातील कार्बोहायड्रेट्स व्यायामासाठी ऊर्जा देतात आणि व्यायामानंतर स्नायूंमधील ग्लायकोजेनची पातळी पूर्ववत करतात. अंडी, मासे, चिकन किंवा कडधान्यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांसोबत तुम्ही उकडलेला किंवा भाजलेला बटाटा खाऊ शकता.
पालक
पालकमध्ये पोटॅशियमसोबतच फोलेट, व्हिटॅमिन के आणि इतर सूक्ष्म पोषक घटक असतात. आहारातील पोषण वाढवण्यासाठी तुम्ही डाळ, भाजी, सूप किंवा ऑम्लेटमध्ये पालक घालू शकता. आहारात पालेभाज्यांचा नियमित समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.
नारळ पाणी
नारळपाण्यात पोटॅशियम आणि आवश्यक द्रवपदार्थ असतात. व्यायामानंतर शरीरातील पाण्याची पातळी (hydration) भरून काढण्यासाठी आणि स्नायूंना आराम देण्यासाठी नारळपाणी पिणे खूप फायदेशीर ठरते.
राजमा
डाळी, राजमा, हरभरा आणि इतर कडधान्यांमध्ये पोटॅशियम, प्लांट-बेस्ड प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. जे लोक फक्त शाकाहारी जेवण घेतात, त्यांच्यासाठी स्नायूंच्या रिकव्हरीसाठी हे पदार्थ खूप उपयुक्त ठरतात. रोजच्या आहारात या कडधान्यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोटॅशियम आणि प्रथिने मिळतात.
एवोकॅडो
एवोकॅडोमध्ये पोटॅशियम, फायबर आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही सॅलड, सँडविच किंवा इतर संतुलित आहारामध्ये एवोकॅडोचा समावेश करू शकता.
दही
दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियमसोबतच पोटॅशियमही असते. व्यायामानंतरच्या आहारात दह्याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. साखर न घालता दह्यासोबत फळे, ओट्स किंवा ड्रायफ्रुट्स खाल्ल्यास शरीराला कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे उत्तम मिश्रण मिळते.







