Traditional Bangles: सिल्क साडीवर हे डिझाईन्स ट्राय करा
Lifestyle Oct 21 2026
Author: Karishma R Image Credits:South india Jewels
Marathi
पीकॉक डिझाईन बांगड्या
या सुंदर अँटिक गोल्ड बांगड्यांवर मोराची आकर्षक नक्षी आणि गुलाबी रंगाचे खडे बसवले आहेत. पारंपरिक कार्यक्रम आणि साडीवर या प्रकारच्या बांगड्या खूप सुंदर लूक देतात.
Image credits: South india Jewels
Marathi
लक्ष्मी डिझाईन बांगड्या
या बांगड्यांवर असलेली देवीची नक्षी आणि लाल-हिरवे खडे यांचे सौंदर्य अधिकच वाढवतात. लग्नसोहळे किंवा पूजेच्या वेळी खास दिसण्यासाठी या पारंपरिक बांगड्या एकदम परफेक्ट आहेत.
Image credits: South india Jewels
Marathi
लक्ष्मी कासू बांगड्या
या बांगड्यांच्या मध्यभागी लक्ष्मी कॉईन डिझाईन असून, हिरव्या आणि गुलाबी खड्यांनी त्यांना सजवले आहे. सण आणि विशेष प्रसंगी घालण्यासाठी हा पारंपरिक बांगड्यांचा सेट उत्तम पर्याय आहे.
Image credits: South india Jewels
Marathi
रुबी (माणिक) बांगड्या
सुंदर लाल रुबी खडे आणि चमकदार पांढऱ्या खड्यांच्या बॉर्डरने या अँटिक बांगड्या तयार केल्या आहेत. कोणत्याही रंगाच्या साडीवर शोभून दिसणाऱ्या या मॅट फिनिश बांगड्या महिलांना आवडतील.