फॅट लॉस वेगाने होण्यासाठी डाएट-व्यायामाशिवाय फॉलो करा या 5 टिप्स

| Published : Jan 10 2025, 09:02 AM IST

weight loss

सार

सध्या बहुतांशजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट ते एक्सरसाइजचा आधार घेतात. पण या दोन्ही गोष्टींशिवायही फॅट लॉस वेगाने होऊ शकते हे तुम्हाला माहितेय का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

Fat Loss Tips : सध्या फिटनेसचा ट्रेन्ड खूप वाढला आहे. प्रत्येकजण फिट आणि हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज आणि डाएटचा आधार घेतात. पण फॅट लॉस करायचे असल्यास डाएटमध्ये काही गोष्टींचे सेवन करणे टाळावे लागते. याशिवाय डाएट आणि एक्सरसाइज यामध्ये संतुलन असणेही फार महत्वाचे आहे. काहीजण दीर्घकाळ फॅट लॉस डाएट फॉलो करतात पण त्यांना काही फरक दिसून येत नाही. खरंतर, या काळात केलेल्या काही चुकांमुळे फॅट लॉस होत नाही. पण वेगाने फॅट लॉस होण्यासाठी काय करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

व्हिटॅमिन के चाचणी करा

फॅट लॉस करायचे असल्यास व्हिटॅमिन डी आणि बी 12 चाचणी करुन घ्या. यामध्ये शरिरात पोषण तत्त्वांची कमतरा असल्याचे दिसल्यास सप्लिमेंट्सची मदत घ्या. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.

शरिराला आराम द्या

फॅट लॉससाठी काहीजण इंटेस ट्रेनिंग म्हणजेच अधिक मेहनतीचा व्यायाम करतात. पण शरिराला व्यायामानंतर आराम देणेही गरजेचे आहे. जेवढी इंटेस ट्रेनिंग अधिक कराल तेवढाच आराम शरिराला देणे आवश्यक आहे. अन्यथा शरिरातील मेटाबॉलिज्मची प्रक्रिया मंदावली जाऊ शकते.

स्ट्रेंथ ट्रेनिंग करा

फॅट लॉस करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता. तुम्ही कार्डिओ अधिक करत असाल मसल्स लॉस होण्याची अधिक शक्यता असते. अशातच स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता. यामध्ये मसल्स लॉस होत नाही. याशिवाय मेटाबॉलिज्मही बूस्ट होतो.

झोप पूर्ण करा

धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप घेणे कठीण झाले आहे. पण फॅट लॉसवेळी झोप पूर्ण होणेही आवश्यक आहे. यामुळे शरिरातील 50 टक्के फॅट लॉस होऊ शकते.

दररोज कॅलरीज मोजा

फॅट लॉस करताना कॅलरीज मोजा. अन्यथा याचा काहीही फायदा होणार नाही. दररोज किती प्रमाणात कोणत्या पदार्थांचे सेवन करता आणि त्यामधील कॅलरीज किती आहेत हे पाहा. याशिवाय किती कॅलरीज बर्न करत आहात हे देखील लिहून ठेवा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

टॉयलेटमध्ये मोबाइलचा वापर करता? उद्भवतील या गंभीर समस्या

प्रवासानंतर पोट बिघडलेय? फॉलो करा या 4 टिप्स