Sour Curd Uses : आंबट दही फेकून देऊ नका, या ५ कामांसाठी नक्की वापरून पाहा!
दही आंबट झालं की अनेकदा आपण ते फेकून देतो. पण तुम्हीही असं करत असाल तर ही चूक पुन्हा करू नका. आंबट दह्याचा घरच्या घरी कसा भन्नाट वापर करता येईल, हे आपण आज पाहणार आहोत.

इडली आणि इतर पदार्थ बनवण्यासाठी
इडली, डोसा, ढोकळा किंवा उत्तप्पा बनवताना तुम्ही आंबट दह्याचा वापर करू शकता. पिठात थोडं आंबट दही मिसळल्यास पीठ छान फुलून यायला मदत होते. यामुळे तुमचे पदार्थ मऊ आणि चविष्ट बनतात.

पनीर मॅरिनेशन आणि ग्रेव्ही
पनीर टिक्का किंवा सोया चाप मॅरिनेट करण्यासाठी तुम्ही आंबट दही वापरू शकता. यामुळे पनीर मऊ होतं. तसेच, भाज्यांची ग्रेव्ही बनवताना टोमॅटोऐवजी किंवा टोमॅटोसोबत फेटलेलं आंबट दही वापरल्यास चव छान येते.
केसांच्या सौंदर्यासाठी
केसांची निगा राखण्यासाठी आंबट दही खूप फायदेशीर ठरतं. कोरड्या आणि निस्तेज केसांना दही लावून थोड्या वेळाने केस धुवा. दह्यात थोडा मध मिसळून तुम्ही याचा हेअर पॅक म्हणूनही वापर करू शकता.
चेहऱ्यासाठी फेस पॅक
चेहऱ्यावरील मृत त्वचा (डेड स्किन) काढण्यासाठी आंबट दह्याचा फेस पॅक म्हणून वापर करता येतो. दह्यात थोडं बेसन, हळद आणि मध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि काही मिनिटांनी हलक्या हाताने धुवून टाका. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर आधी पॅच टेस्ट नक्की करा.
तांब्या-पितळेची भांडी चमकवण्यासाठी
घरातील तांब्याची किंवा पितळेची भांडी काळी पडली असतील, तर आंबट दह्यात थोडं मीठ किंवा पीठ मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट भांड्यांना लावून हलक्या हाताने घासा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढा. भांडी लगेच चमकतील.

